Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपाचा ‘राष्ट्रवाद’ कोणता?

भाजपाचा ‘राष्ट्रवाद’ कोणता?

म्मू काश्मीरमध्ये आठ वर्षाच्या चिमुरडीला सहा दिवस बंदीस्त करुन तिच्यावर पाच नराधमांनी आळीपाळीने क्रुरपणे पाश्वी अत्याचार केला. चिमुरडीची हत्या केली. अत्याचार करणारा, तथाकथीत पुजारी, जनतेचा रक्षण करणारा खाकी वर्दीतील सैतान आरोपीचा समावेश होता. अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढली जाते. या रॅलीचे आयोजन हिंदू एकता मंचच्या नावाने करण्यात येते. त्यामध्ये रॅलीत जम्मू काश्मीरचे भाजपाचे दोन मंत्री या रॅलीत सहभागी होतात. तर तेथील वकिल या बलात्कारांच्या समर्थनार्थ नारेबाजी करतात. हाच का भाजपचा राष्ट्रवाद? बलात्काऱ्यांच्या समर्थनाथ तिरंगे झेंडे घेऊन रॅली काढल्या जाते. नराधमांसाठी आंदोलन केला जातो. परंतु त्या पीडितेला न्याय मिळावा म्हणून कुणी पुढाकार घेत नाही. एकीकडे याच भाजपाने ‘महिला के सन्मान मे भाजपा मैदान मे, बेटी बचाव, बेटी पढाव चे नारे दिले होते. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली आणि अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. अशा भयानक गुन्ह्यातील आरोपींचा कोण कसा काय बचाव करु शकतो ? कठुआमध्ये असिफाबरोबर जे घडले तो मानवतेच्या विरोधातील गुन्हा आहे. दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे असे राहुल गांधींनी म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, जे काही घडले त्याबद्दल माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत. ही मानवतेची हत्या असून न्याय हा झालाच पाहिजे. कठुआ आणि उन्नावमधील घटना या माणुसकी संपल्याचे लक्षण आहे. खरतर संताप येतो चीड निर्माण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ बद्दल बोलतात, पण तु पक्षाचा आमदार तिरंगा हातात घेऊन आरोपीच्या बचावासाठी आंदोलन करतो यातून ढोंगीपणा दिसतो असे असादउद्दीन ओवेसी म्हणाले. माणूस आणि पशूमध्ये फरक आहे. पण कठुआमध्ये आठ वर्षाच्या मुलीबरोबर जे घडले ते पाहून माणूस म्हणजे शिवी वाटते. बॉलीवूडमधून अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, सोनम कपूर, फरहान अख्तर, गौतम गंभीर, टेनीसपटू सानिया मिर्झा, यांच्यासह विविध संघटनांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे उत्तरप्रदेशमधील पीडितेच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आमदार सैगरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन सुध्दा त्याला अटक करण्यात आली नाही. मुख्यमंत्री आदीत्यनाथ त्यांच्या पक्षाच्या बलात्कारी आमदाराला पाठिशी घालत आहेत. तर भाजपाचे पक्षाअध्यक्ष अमित शहा या विषयावर बोलण्यास नकार देऊन एकाप्रकारे बलात्कारी आमदाराचे समर्थन करत आहेत. या तुम्ही काहीही करा पक्ष,सरकार तुमच्या पाठिशी आहे. असा जणू काही कायदाच भाजपामध्ये तयार झाला आहे. यामुळे तुम्ही भ्रष्टाचार करा,खून करा, बलात्कार करा, तुमच्या मागे सरकार आहे. अशा प्रकारे देशात भाजपाचा कारभार सुरु आहे. बलात्काऱ्यांना सूट देणे हाच भाजपाचा राष्ट्रवाद आहे का?

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments