skip to content
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजनया प्रसिद्ध संगीतकारावर आली भीक मागण्याची वेळ

या प्रसिद्ध संगीतकारावर आली भीक मागण्याची वेळ

केशव लालसंगीतकार केशव लाल यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध गायक, निर्मात्यांसोबत काम केले आहे. पण आज त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते हार्मोनियन गळ्यात घालून रस्त्यावर आपल्या पत्नीसोबत फिरत आहेत. कमावण्याचा कोणताही मार्ग नसल्याने ते ३० वर्षांपासून रस्त्यावर राहात होते. गाणे गाऊन भीक मागण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय नाहीये. मुंबई-पुणे रस्त्यावर त्यांना अनेकवेळा पाहायला मिळते.

केशव लाल यांनी निर्माते व्ही शांताराम तसेच संगीतकार कल्याणजी, आनंदजी यांच्यासोबत अनेक वर्षं काम केले आहे. केशव लाल यांचा जन्म हा श्रीलंकेत झाला होता. त्यांचे वडील सैन्यात होते. दुसऱ्या युद्धाच्या वेळी त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि ते इथेच राहायला लागले. त्यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सगळे काही सुरळीत सुरू होते. पण त्यांनी कायम स्टुडिओमध्ये राहून काम करावे असे चित्रपट निर्मात्यांचे म्हणणे होते. पण त्यांचे लग्न झाले असल्याने कायम स्टुडिओत राहाणे त्यांना शक्य नव्हते. कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली. त्यामुळे आता मुंबईत आपले काही होऊ शकत नाही असा विचार करून केशव लाल पुण्याला राहायला गेले. पुण्याला गेल्यानंतर त्यांना काहीतरी नोकरी मिळेल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडेल असे त्यांना वाटत होते. पण तिथे गेल्यावर त्यांच्यावर फुटपाथवर राहाण्याची वेळ आली. २०१५ साली एका मीडिया हाऊसच्या समोर ते हार्मोनियम वाजवून भीक मागत होते. त्यावेळी त्यांना तेथील एका व्यक्तीने एका इव्हेंटमध्ये वाद्य वाजवण्याची संधी मिळाली. पुण्यातील मंगेशकर हॉलमध्ये त्यांनी वाद्य वाजवले. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना त्यांच्या संगीताने भुरळ घातली. तेथील काही लोकांनी त्यांना पुण्यात एक छोटेशे घर घेऊन दिले आणि काही गणेश मंडळांनी मिळून त्यांना एक लाख रुपये दिले. पण आजही उदरनिर्वाहासाठी त्यांना भीक मागायला लागत आहे. त्यांचे गाणे गातानाचे काही व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments