मुंबई: अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई पोलीस सेवेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न राणे ठार झाले. ते दुकाचीवरुन जात असतांना अज्ञात वाहनानं धडक दिली. रविवारी ४ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास बोरिवली मागाठाणे परिसरात घडली.
शत्रुघ्न राणे विशेष शाखा २ मध्ये कार्यरत होते व कांदिवली येथे वास्तव्यास होते. याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.