Monday, May 13, 2024
Homeविदेशपंतप्रधान मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का? काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का? काँग्रेसचा सवाल

PM Modi, Chinaनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून, तेथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र या भेटीपूर्वीच काँग्रेसने मोदींवर घाणाघात करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या भेटीदरम्यान होणाऱ्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या रणनीतिक हितांचे रक्षण करून डोकलामबाबत चीनकडे रोखठोक विचारणा करतील का? अशी विचारणा केली आहे.

सुरजेवाला म्हणाले की भारत सध्या चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाचा सामना करत आहे. “चीन सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये डोकलामच्या दक्षिणेस चिकन नेक जवळ एक नवा रस्ता बांधत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना याची गंधवार्ता नसल्याचेच दिसत आहे. ते चीनला कठोर संदेश का देऊ शकत नाहीत, कुणास ठावूक.”

सुरजेवाला यांनी यासंदर्भात एक सॅटेलाइट फोटोही ट्विट केला आहे. ” हे छायाचित्र २५ एप्रिल २०१८ चे असून, हे छायाचित्र सांगते की भारतीय लष्करी तळापासून काही मीटर अंतरावर चीनने बांधकाम केले आहे. याविरोधात पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे का? मोदी आज होणाऱ्या मुळाखतीत चिनी राष्ट्राध्यक्षांसमोर हा प्रश्न उपस्थित करणार का? मोदी डोकलाम मुद्द्यावर भारताचे हित विचारात घेऊन चीनसोबत रोखठोक चर्चा करण्याची हिंमत दाखवणार का?” असे सवाल सुरजेवाला यांनी केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी रात्री उशिरा चीनच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या वुहान शहरात पोहोचले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात 24 तासात सहा वेळा मोदी व जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहेत. मोदी व जिनपिंग यांच्याच होणाऱ्या बैठकींमधील दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये दोन्ही देशातील सहा-सहा सदस्यांचं शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. शुक्रवारी या दोन्ही बैठका पार पडणार आहेत. यातील पहिली भेट ही हुवई प्रॉर्विस म्युझियममध्ये होईल. तर दुसरी बैठक इस्ट लेक किनाऱ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये होइल. यानंतर रात्री जेवणाच्या दरम्यानही दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,या बैठकीला उच्चस्तरीय चर्चा म्हणणं चुकीचं ठरेल. या बैठकीसाठी विशिष्ट मुद्दे ठरले नाहीत. आतंकवाद, सीमा वाद असे काही मुद्देही यामध्ये असतील. या अनौपचारिक संवादादरम्यान कुठल्याही करारावर हस्ताक्षर होणार नाही, हे आधीच ठरलेलं आहे. शनिवारी मोदी व जिनपिंग यांच्यात 3 बैठका होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments