Saturday, May 4, 2024
Homeविदेशअमेरिकेचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला

अमेरिकेचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला

इस्लामाबाद: पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. अमेरिकेने आज पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला असून त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

अमेरिकेने पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील आदिवासीबहुल केंद्रशासित प्रदेशामधील ( फेडरली अॅडमिनिस्ट्रेशन ट्रायबल एरिया) दहशतवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा मोहरक्या एहसान खावेरी याच्यासह आणखी तीन अतिरेक्यांचा ठार करण्यात आल्याचं अधिकृत वृत्त आहे. या हल्ल्यात आणखीही अतिरेकी ठार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाकिस्तानच्या हिंगू जिल्ह्याजवळ हा ड्रोन हल्ला करण्यात आला असून अमेरिकेने ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्रांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले आहेत.
अमेरिकेची ही कारवाई म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशाराच असल्याचं मानलं जातं. अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया करून पाकमध्ये लपणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी. या दहशतवाद्यांना अटक करावी किंवा त्यांना देशाच्या बाहेर हाकलून द्यावे, असा इशारा अमेरिकेने या आधीच पाकिस्तानला दिला होता. तालिबानी संघटना आणि हक्कानी दहशतवादी संघटनांच्याविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी, असा इशाराही अमेरिकेने यापूर्वी दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments