Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखहंसराज अहीर हा सत्तेचा माज का?

हंसराज अहीर हा सत्तेचा माज का?

माजात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. डॉक्टरांना समाजात मानाचे स्थान आहे. परंतु डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे, त्यांनी नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे! आम्ही त्यांच्यावर गोळ्या घालू. असे चिड निर्माण करणारे विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर  यांनी केले. खरतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर हे एक जबाबदार मंत्री आहेत परंतु ते गोळ्या घालण्याची भाषा करत असतील तर त्यांच्यात आणि अतिरेक्यात काय फर्क असा सवाल उपस्थित होतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दिनद्याल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ झाला. या स्टोअर्समधून रुग्णांना २४ तास स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत. संकल्पना चांगली आहे. परंतु अहीर यांनी जी मस्तवाल भाषा केली ती संतापजनक चीड निर्माण करणारी आहे. ते म्हणाले कार्यक्रमासाठी मी येणार होतो हे माहित असून देखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु! परंतु अहीर हे का विसरले की आज,ख्रिसमची सुट्टी होती. त्यामुळे कदाचीत डॉक्टर तेथे उपस्थित नसतीलही. उपस्थित नाही याचा अर्थ त्यांना तुम्ही गोळ्या झाडून मारणार का? हे अधिकार तुम्हाला कुणी दिले? तुम्ही मंत्री असून अतिरेक्यांची भाषा करत असाल तर हीच का तुमची लोकशाही. अहीर यांना ही भाषा शोभत नाही परंतु सत्तेची गुर्मी ही त्यांनी दाखवून दिली. ज्या समाजात डॉक्टरांना देव मानले जाते त्याच डॉक्टरांवर अहीर गोळ्या झाडण्याची भाषा करत असाल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. भाजपाचे अनेक मंत्री,आमदार,खासदार,पदाधिकारी हे बेताल आणि मस्तवाल वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द आहेत. हा सत्तेचा माज असून सत्ता,पद,हे फार काळ राहत नाही.हे त्यांनी विसरता कामा नये. राजकीय व्यक्तींच्या डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर असायला हवे असे नेहमीच बोलले जाते. सत्ताधारी पक्षातील मंडळींकडून दादागिरी आणि समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत. असे विधान करु नये या बाबत पंतप्रधान,राज्यांचे मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून ब्र सुध्दा निघत नाही. याचाच अर्थ यांना ही नेतेमंडळी खतपाणी घालतात. याला वेळेवर आवरणे गरजेचे आहे अन्यथा देशातील वातावरण हे हानीकारक होईल हे समजणे गरजेचे आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments