Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखअवलादीच्या फैरी!

अवलादीच्या फैरी!

जित पवार यांनी, शिवसेना ही गांडुळाची अवलाद असल्याची टीका केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून अजित पवारांवर प्रतिहल्ला केला. तुम्ही दुतोंड्या विषारी सापाची अवलाद असल्याची टीका केली. राजकीय नेत्यांच्या भाषांवरुन त्यांच्या बुध्दीची किव येते. राजकीय आयुष्यात काम करत असतांना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवुन काम करायले पाहिजे असं नेहमीच सांगितल जातं. परंतु आता कोण कीती खालच्या पातळीवर जाऊन प्रहार करतो त्याचीच जणू काही स्पर्धा लागली की काय? असा प्रश्न पडतो. शिवसेना व भाजपाच्या नेत्यांनी तर एकमेकांचे एवढे वस्त्रहरण केले होते हे सर्व जनतेने तमाशा बघितला,ऐकला. जो नेता जितक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका टीपणी करेल तो नेता तितका प्रभावी असा काही नेत्यांचा,पक्षाचा समज झाला आहे. अजित पवारांना ‘शिवसेना ही गांडुळाची अवलाद’ म्हणण्याची वेळ का आलेली आहे. शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेना हे सत्तेत राहून मौजमजा करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांप्रमाणे स्वयपक्षीय सरकारवरच तुडून पडत आहेत. हिच चुक शिवसेना नेतृत्वाने केल्यामुळे त्यांना गांडुळाची अवलाद म्हणण्याची हिंमत अजित पवारांनी केली. अजित पवारांनी टीका केल्यानंतर ती टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना झोंबल्यामुळे त्यांनीही मुखपत्रातून प्रहार केला. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद असल्याची टीका केली. सत्तेच्या खुर्च्या उबवून स्वत:चं हित पाहाणाऱ्या अजित पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय असा सवाल मुखपत्रातून उपस्थित केला. अजित पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? जर हाच प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला तर उध्दव ठाकरे यांचं खरच महाराष्ट्रासाठी योगदान काय? उध्दव ठाकरे हे घरातीलच मालकीच्या पक्षाचे प्रमुख आहेत. स्वत: कर्तृत्वशुन्य! दादागिरी,फोडा,आणि झोडा हाच एक कलमी कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्रासाठी उध्दव ठाकरे यांनीही काही दिवे लावले नाही. परंतु विरोध म्हणून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे हे टीका करुन स्वत:च्या पक्षाचा बचाव करत असतील तर ते कुणाच्याही पचनी पडणार नाही. फक्त टीका टीपणी करुन आपले पाप झाकता येणार नाही. सत्तेच्या सर्वसुखसोयी उपभोगायच्या आणि विरोध दाखवायचा यामुळेच विरोधक टीका करुन झोडपून काढत आहेत. शिवसेना मित्रपक्ष भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि नौटंकीबाज राजकारण करतात हे जनतेलाही कळतंय, जनता काही दुधखुळी नाही. शिवसेना नेहमीच सत्तेच्या बाहेर पडण्याच्या खोट्या वलग्ना करुन आम्ही भाजपा आणि सत्तेपासून खूप लांब आहेत. आम्हाला काही देणेघेणे नाही अशा तोऱ्यात ते वावरतात. राजीनामे देऊ अशा थापा मारत असल्यामुळेच शिवसेनेला गांडुळाची अवलाद म्हणण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आली. जसजशा निवडणूका जवळ येतील तशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातील. मात्र याने विकासाचा मार्ग निघणार नाही. आज राज्यात देशात जातीय हिंसाचार, रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, व्यापार, शेतकरी आत्महत्या, खून, बलात्कार, दरोडो असे एक ना अनेक प्रश्न आ वासून बसले आहेत. महागाईवरुन जनतेचे शोषन होत चालले आहे. हे सर्व प्रश्न भेडसावत असतांना सत्ताधाऱ्यांनी त्याच्यातून मार्ग काढायला हवा. विरोधकांनाही विश्वासात घेतले पाहिजे परंतु शिवसेना सत्तेत राहून जे सोंग करत आहेत ते चुकीचचं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोपात वेळ न वाया घालवता विकासात्मक काम करुन मार्ग काढवा एवढीच जनतेची माफक अपेक्षा!

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments