Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखपवारांची ओबीसी खेळी!

पवारांची ओबीसी खेळी!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशअध्यक्षपदाचा सुनील तटकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागी तरुण व ओबीसा चेहरा दिला जाणार आहे. राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष असल्याचा प्रचार काही पक्षांनी केला होता. राष्ट्रवादीला मराठ्याचा लेबल लागल्यामुळे पक्षाला म्हणाव तस यश काही वर्षात आलं नाही. परंतु तो लेबल हटविण्याचं प्रयत्न पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार करत आहेत. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष तरुण आणि ओबीसी द्याचा म्हटल तर प्रथम नाव येतो तो धनंजय मुंडे यांचा. धनंजय मुंडे यांचे वकृत्व चांगले असून ते अभ्यासू नेते म्हणून गणले जातात. आपल्या विरोधकांवर तुटून पडण्यात मुंडे हे पटाईत आहेत. हल्लाबोल यात्रेतून त्यांच्या भाषणातून ते किती प्रभावी नेते आहेत हे याचा सर्वांनाच अनुभव आलेला आहे. परंतु यामुळे पक्ष वाढेल का? इतर समाज राष्ट्रवादी सोबत जाईल का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. पक्षाचे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या तुरुंगात आहेत. भुजबळ यांना युती सरकारने तुरुंगात डांबून ओबीसी नेत्याचे राजकारण संपवण्याचे कटकारस्थान केले. असा एक राग ओबीसी समाजात आहे. तसेच भुजबळांना तुरुंगात डांबून राष्ट्रवादीला कमजोर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. राष्ट्रवादीला बळकट करण्यासाठी व राष्ट्रवादी हा फक्त मराठ्यांचा पक्ष आहे तो लेबल हटविण्यासाठी मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देऊन पवार वेगळी खेळी खेळू शकतात. मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन पवार ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी व राष्ट्रवादी हा फक्त मराठ्यांचाच पक्ष नाही असा संदेश देऊ शकतात. राष्ट्रवादीने राज्यात हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणला. जनतेपर्यंत पोहचण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी यशस्वीही झाली. येत्या विधानसभा,लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस सोबत निवडणूका लढवणार हे जवळपास निश्चितच आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांची जवळीकता वाढली आहे. राज्यात आणि केंद्रातून युतीला हद्पार करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीला काही दिवसांपूर्वी जी मरगळ होती ती मरगळ मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. पक्ष सत्तेत नसला तर कार्यकर्तेही लांब पळतात. राष्ट्रवादीचा काही दिवस अपवाद सोडला तर काही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अपयश आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. हाच आक्रमक पणा त्यांना कायम ठेवावा लागणार आहे. सर्वजातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन् राजकारण करणे यामध्ये पवार खूप मुरब्बी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईलच. परंतु मुंडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला तरुण व चांगल वकृत्व असलेला अध्यक्ष लाभल्यानंतर त्याचा पक्षाला फायदाच होईल. व पवारांची खेळीही यशस्वी होईल.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments