Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमोदी विरुध्द भाजप

मोदी विरुध्द भाजप

भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिटलरशाहीला कंटाळून व देशातील परिस्थितीला मोदीच जबाबदार आहेत असं आरोप करुन भाजपाला सोडचिठ्ठी दिली. सिन्हा यांचीच पक्षात घुसमट होत आहेत असंही नाही. भाजपाचे बरेच मंत्री,नेते हे मोदींच्या कारभाराला कंटाळले आहेत. पक्षात भाजपाच्या नेत्यांचीच घुसमट होत आहेत. पडद्यासमोरुन टीका करणाऱ्यांपेक्षा कित्येक पटाने पडद्यामागून मोदींवर टीका करणारे नेते भाजपात आहेत. मोदी आणि अमित शहा ही जोडी कुणालाही पक्षामध्ये थारा देत नाहीत. आम्ही जे बोलू तोच अंतीम शब्द. काही दिवसांपूर्वीच भंडारा गोंदीयाचे खासदार म्हणून नाना पटोले काम करता असतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या विषय मोदींसमोर खासदारांच्या बैठकीत मांडला होता त्यावेळी मोदींनी तुम्ही बोलू नका तुम्हाला काही कळत नाही. असं बोलून फटकारलं होत. त्यामुळे नाराज नाना पटोलेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९च्या लोकसभेपूर्वी बरेच नेते पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पक्षाने २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. पक्षाच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहेत. अशी एक ना अनेक कारणे आहेत. यामुळे पक्षातील मंडळी मोदी,शाहच्या जोडीला कंटाळली आहे. सिन्हा हे भाजपा बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, भाजपाच्या नेतृत्वाने जनतेला दिलेल्या अभिवचनांचे पालन केले नाही म्हणून नेतृत्वाविरोधात भाजपा खासदारांनी बंड पुकारावे असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे. त्यावरून ते पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत होते यावरुन स्पष्ट झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी यशवंत सिन्हा नाराज होते आणि त्यांनी सरकारच्या अनेक मुद्यांच्या विरोधात आवाजही उठविला  होता. पण अडवाणी युगातील या नेत्याकडे मोदींनी तसेच पक्षनेतृत्वाने आजवर दुर्लक्षच केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह एका व्यासपीठावर उपस्थित राहून यशवंत सिन्हा यांनी पक्षनेतृत्वाला डिवचले  होते. उपोषण करणाऱ्या आप पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांच्या भेटीस भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा गेल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या हालचालींची गंभीर दखल घेतली. आज ना उद्या शत्रुघ्न सिन्हा हे सुध्दा भाजपाला सोडचिठ्ठी देतील. ते सुध्दा मोदींच्या धोरणाविषय खुलेआम माध्यमांसमोर, तसेच व्यासपीठांवर आपल्या भाषणात टीका करतात. सिन्हा यांच्यावर पक्ष सध्या तरी काही कारवाई करणार नाही. परंतु २०१९ च्या निवडणूका आधीच सिन्हा हे सुध्दा यशवंत सिन्हा प्रमाणे पक्षातून बाहेर पडतील. सध्याही ते भाजपामध्ये फक्त नावापुरतेच आहे. पुढे ते लालू प्रसाद यांच्या पक्षात प्रवेश घेतला तर आश्चर्य वाटायला नको. लालू प्रसाद कुटुंबियांचे सिन्हा यांचे खूप घनिष्ट संबंध आहेत. मात्र एक गोष्ट नक्की मोदींना भाजपाच्याच अंतर्गत कलाहाचा धोका जास्त निर्माण झाला आहे.यामुळे भाजपाला येणार काळ संकटाच राहिल असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. यासाठी मोदींनी स्वत:च आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments