Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमंत्रालय बनले आत्महत्यालय!

मंत्रालय बनले आत्महत्यालय!

रकारला प्रत्येक बाबतीत नाकर्तेपणा आल्यामुळे जो कुणी येऊन मंत्रालयात आत्महत्या करत आहेत. आजही मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडाली. ८५ वर्षीय वृध्द शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या वयोवृध्दाने मंत्रालयाच्या दारातच विष पिऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना आज तरुणाने मंत्रालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन जिवन संपवले. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी,बेरोजगार हे मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहेत. बुधवारी अविनाश शेट्ये यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. भाजपाचे नेते दावा करतात त्याप्रमाणे त्यांचे सरकार खरंच वेगळे आहे. कारण त्यांच्या काळातच मंत्रालयाचे ‘आत्महत्या’लय झाले, असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला होता. व त्याची प्रचिती जनतेलाही येत आहेत. आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल, असे निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने सांगत असत. खरेच हे सरकार आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहे. धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण काँग्रेसच्या काळातले असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना विषप्राशन करून आत्महत्या केली होती. त्याचवर्षी राजू आंगळे या तरुणाने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. मात्र, जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही. मात्र आज सरकार चे मंत्री मुजोरपणातच जास्त वेळ वाया घालवत आहेत. सरकार च्या कामकाजावर आज सर्वच मंडळी नाखूश आहेत. शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. तारीख पे तारीख देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाची पानं पुसली. सरकार निर्णय घेण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. अधिकारी काम करायला तयार नाही. लोकप्रतिनीधींचे जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष आहेत. राज्यातील शिवसेना,भाजपा सत्ताधारी पक्ष सत्तेची फळे चाखत आहेत. परंतु दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. शिवसेना सत्तेत असूनही भाजपावर रात्रं दिवस खडे फोडण्यात वेळ वाया घालवत आहेत. राज्याच्या दोन्ही पक्षांनी राज्याच्या जनतेचा तमाशा करुन टाकला आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments