Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबाबासाहेबांना तर सोडा!

बाबासाहेबांना तर सोडा!

त्तरप्रदेश सरकारने डॉ.बाबासाहेबांच्या नावावरुन काढलेला फतवा हा आपलं अपयश झाकण्यासाठी केलेली खेळी आहे. योगी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले परंतु जातीय दंगली, ऑक्सीजन अभावी मुलांच मृत्यू, तसेच नुकतचं पोटनिवडणूकीत आलेल अपयश, राम मंदिराचा विषय हे यात भाजपाची गोची झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विषय उरकून काढण्यात आला. परंतु या विषयामुळे सरकारला आपलं अपयश लपवता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या पहिल्या प्रतीवर ‘भीमराव रामजी आंबेडकर’ अशी सही केली होती. त्याचाच हवाला देत उत्तर प्रदेश सरकारनं यापुढे बाबासाहेबांचं पूर्ण नाव लिहिण्याचा आदेश काढला. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी बाबासाहेबांच्या नावाचा योग्य उच्चार करण्याचा यूपी सरकारला सल्ला दिला होता. पण योगी सरकारनं त्यापुढे जाऊन बाबासाहेबांचे पूर्ण नाव ‘भीमराव रामजी आंबेडकर,’ असं लिहिण्याचा आदेश काढला. परंतु सरकारला बाबासाहेबांबद्दल आदर आहे कींवा खूप प्ररेणा त्यांनी घेतलेली तसाही तो प्रकार नाही.खरतर याला विरोध होणार हे सरकारला पूर्व कल्पना होती परंतु जाणूनबुजून हा प्रकार तेथे करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बी.आर.आंबेडकर म्हणून सही करतच होते मात्र हा फतका कशासाठी? सरकारला तेथील दलित जनतेला दाखवायचे आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर हिंदूचा प्रभाव होता. याच भावनेतून ही खेळी खेळलेली आहे. आज कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तसेच थोर महापुरुषांच्या नावापुढे त्यांचे वडिलांचे नाव लिहिलेले आहेत. हे योगी सरकारने जाहीर केलं तर बरं होईल. मात्र समाजात तेढ निर्माण करुन वातावरण बिघडवून समाजा समजात फूट पाडायची असाच काम हे सरकार करत आहेत. एकीकडे योगी यांच्या पक्षातील नेते,पदाधिकारी संविधान बदलण्याची भाषा करतात दुसरीकडे डॉ.बाबासाहेबांबद्दल आम्हाला खूप आदर आहेत असा आव आणत आहेत. केंद्रीय संसदीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकातील एका सभेत बोलताना राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दास हरकत घेऊन अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे सांगून ही राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपा सत्तेत आल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून लोकसभेसह इतर ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. तसेच काँग्रेसच्या सदस्यांनी हेगडे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी करुन सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर हेगडे यांनी संसदेत माफीही मागितली होती. ‘मी देशाचे संविधान, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनोभावे आदर करतो. संविधान माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यावर कोणतीही शंका नाही. मी देशाचा नागरिक असल्याने मी त्याविरोधात कधीही जाणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली होती. दुतोंडी सापासारखे वागणारा पक्ष आणि त्यांचे नेते डॉ.बाबासाहेबांच्या नावावर भांडवल करुन व्देष निर्माण करण्याचे काम करत आहेत. हे जनतेने वेळेवर समजून घेणे गरजेचे आहे.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments