Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखखडसेंच खळ्ळखट्याक!

खडसेंच खळ्ळखट्याक!

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राजकीय गेम करणाऱ्या भाजपा विरुध्द खडसे खळळखट्याक करण्याच्या तयारी आहेत. उत्तर महाराष्ट्राला मॅग्नेटिक महाराष्ट्रातील प्रकल्पातून १५ लाख कोटींपैकी मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही प्रकल्प दिला नाही. असा आरोप खडसे यांनी केला. हा अन्याय उत्तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. खडसेंनी दिलेला इशारा हा गंभीर आहे. खडसे हे भाजपाला रामराम करण्याच्या तयारी आहेत. पक्षामध्ये त्यांना बाजूला फेकून दिल्यामुळे ते चांगलेच अस्वस्थ आहेत. खरतर ज्या व्यक्तीने पक्षासाठी ४० वर्ष घालवले त्या व्यक्तीची अवस्था दैनीय झाली. जळगाव जिल्ह्यातील विकासात्मक कामे थांबलेली आहेत. अमळनेरसह बोदवड आणि मुक्ताईनगर तालुके पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत. हे जिल्हे टंचाईग्रस्त जाहीर करण्यासाठी सरकार चालढकल करत आहेत. यासाठी सत्ताधारी पक्षातील माजी मंत्र्याला स्वता:च्या सरकार विरोधात इशारे द्यावे लागत आहे हेच मोठ दुर्देव म्हणाव लागेल. खडसे यांनी अधिवेशनापूर्वी जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर झाले नाही तर याबाबत अन्याय सहन न करता आवाज उठवला जाईल. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी उचलेलं पाऊल योग्यच आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपशेल खडसेंकडे दुर्लक्ष करुन खडसेंच राजकारण संपवण्याचा हा कट आहे. कर्जमाफी झाली तरी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. शेतकरी अस्वस्थ आहे. दुष्काळाबाबत वारंवार पाठपुरावा केला तरीही काम होत नाही. दुष्काळ जाहीर करायला इतका वेळा का लागतो. खडसे आता स्वत: म्हणत आहेत की मी दोषी असेल तर सरकार मला का तुरुंगात टाकत नाही. मी काय पाप केले आहे. आणि पक्षाचे इतके काय वाईट केले. माझ्यावर कसा अन्याय होत आहे. अशी खंत ते आता कार्यक्रमात बोलून दाखवत असतील तर पक्षाने गांभीर्याने याचा विचार करायला हवा. मात्र पक्षाने त्यांना संपवण्याचा विडा उचलला. खडसेंच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जाऊ नये यासाठी भाजपाची मंडळी त्यांना फोन करुन थांबवत आहे. परंतु हाच प्रकार भाजपाला अंगलट येईल. खडसेंनी काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत एका कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगितल होत. त्याची खूप चर्चाही रंगली होती. खडसे यांनी दस्तुरखुद्द सांगितले होते की मला जे काही सांगायचे होते ते मी अजित दादांच्या कानात सांगितले. राष्ट्रवादीनेही खडसेंना प्रवेशासाठी इशारे केले होते.प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुध्दा खडसे यांना काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. भाजपाने खडसेंविरोधात चालवलेला नालायकपणा त्यांच्याच अंगलट येईल. व याचा फटका त्यांना २०१९ च्या निवडणूकीत दिसून येईल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments