Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकाकडेंचे कानटोचल्याने उपरती!

काकडेंचे कानटोचल्याने उपरती!

राजकारणात चाटूगिरी करणारे नेते पद टिकवण्यासाठी आपल्या जन्मदात्यांनाही विसरुन जे ‘जी हुजूरी’ करतात त्यातील एक महाभाग म्हणजे भाजपाचे खासदार संजय काकडे यांचा क्रमांक लागतो. कारण गुजरातमध्ये सरकारविरोधी वातावरण असल्याने भाजपची सत्ता येण्याची शक्‍यता नाही  असे विधान त्यांनी त्यावेळी केले होते. तेव्हा पासून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. मात्र दिल्लीश्वरांनी कान टोचताच त्यांनी यू टर्न घेतला. काकडे आता म्हणू लागले की ‘भाजपा आपल्यासाठी आई असून पंतप्रधान मोदी आपल्याला वडिलांच्या जागी आहेत. तर, मुख्यमंत्री फडणवीस छोट्या भावाप्रमाणे आहे. आईशी कोणी गद्दारी करीत नाही. असे स्पष्टीकरण खासदार काकडे यांना द्यावे लागत आहेत. परंतु हे स्पष्टीकरण काकडे यांनी पक्षाच्या दबावात दिले की, हकालपट्टीच्या भितीने दिले हे सांगण्याची गजर उरली नाही. खासदार काकडे यांनी नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू आणि गांधी घराण्यातील अन्य नेत्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ नेते आहेत, असा दावा करुन स्वत:ची लाचारी स्पष्ट करुन दिली. भाजप आपल्याला मातेसमान, मोदी पित्यासमान आणि देवेंद्र फडणवीस लहान बंधु समान असल्याचे भावनिक होऊन म्हटले आहे. अस गुजरात निवडणूकीच्या निकालाच्या नऊ दिवसानंतर असा काय चमत्कार घडला की,मोदी हे नेहरु पेक्षा श्रेष्ठ बनले. हे काकडेंनी देशातील जनतेला तरी स्पष्टपणे सांगायची गरज आहे. खासदार काकडे यांनी पुणे महापालिका निवडणुकीवेळी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरल्याने त्यांच्या भाकिताला महत्व प्राप्त झाले होते. परंतु भाजपाच्या शऋघ्न सिंन्हा, अरुण शौरी,यशवंत सिन्हा या नेत्यांनीही मोदींच्या कामकाजाचा समाचार घेतलेला आहे पंरतु ते आजही आपल्या विधानावर ठाम आहेत. असे नेते बरेच आहेत. परंतु काकडे यांनी जी लाचारी पत्कारली त्यावर बरेच काही बोलता येईल,लिहीता येईल. भाजपाचा मी सहयोगी सदस्य आहे. भाजपा आपल्यासाठी आई असून पंतप्रधान मोदी आपल्याला वडिलांच्या जागी आहेत. तर, मुख्यमंत्री फडणवीस छोट्या भावाप्रमाणे आहे. आईशी कोणी गद्दारी करीत नाही. त्यामुळे पक्ष विरोधात ही कृती नसून निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर हा अंदाज वर्तविला होता. असे ओरडून ओरडून काकडे बोलत आहेत. परंतु खर काय खोट काय हे जनतेला कळतय यामुळे काकडेंनी कितीही आदळआपट केली तरी भाजपाच्या पक्षश्रेष्ठी जवळ काय तो संदेश पोहोचायचा होता तो पोहोचलेलाच आहे. परंतु अशा चाटूगिरी करणाऱ्यां नेत्यांना असले राजकारण लखलख लाभो!

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments