Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसरकारचे ‘बेरोजगारांना’ दंडुके!

सरकारचे ‘बेरोजगारांना’ दंडुके!

रोजगार मागण्यासाठी रेल्वेच्या प्रशिक्षाणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत. पोलिसीबळाचा वापर करुन विद्यार्थ्यांचा आंदोलन चिरडण्यासाठी लाठ्या मारुन त्यांची डोकी फोडली जाते. लोकशाही देशात जर रोजगार मागण्यासाठी तरुणांना रस्त्यावर उतरुन आपल्या आंदोलन कराव लागत असेल तर त्या देशातील अवस्था किती वाईट आहे. षंड सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून खेचण्याची वेळ जनतेवर येऊन ठेपली. षंड सत्ताधाऱ्यांना तरुणांच्या रोजगाराशी काही देणेघेणे नाही यावरुन स्पष्ट होते. शेतकरी, अंगणवाडी सेवीका,आदीवासी,सरकारी कर्मचारी आपल्या मागण्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहेत. परंतु हक्काच रोजगार त्यांना दिला जात नाही. पोलिसीबळाचा वापर करुन सरकार आंदोलन चिरडण्याचं काम करत आहे. ‘सबका साथ सबका विकास’च्या गप्पा मारणारे गरिबांना रोजगार देण्यासाठी कुंभकर्णी झोपेत आहेत. मात्र अंबानी,अदानी सारख्या धनदांडग्यांना ८ लाख ५५ कोटींच्या कर्जाची खैरात वाटप केली गेली. विजय माल्या,ललीत मोदी,निरव मोदी,मेहुल चौक्शी,या भांडवलदारांनी हजारो कोटी रुपये घेऊन् सरकारच्या आर्शीवादाने विदेशात पोबारा केला. मात्र आमच्या हक्काचा रोजगार मागणाऱ्यांना रोजगार दिला जात नाही हेच आपल दुर्देव म्हणाव लागेल. आज ज्या तरुणांना आंदोलन केल त्यांच्या मागण्या तरी काय होत्या. रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी २० टक्के असलेला कोटा रद्द करावा,रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा या मागण्या होत्या. त्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागल. आणि त्या तरुणांना लाठ्या काठ्या खाव्या लागल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढावे लागतात. नुकताच एक शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता. सहा दिवस २०० किलोमीटर पायी च़ालून मोर्चेकरी मुंबईत आले होते. पाय सोलून गेले होते. पायांना फोड आले होते. त्या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणून त्यांच्यावर आरोप लावण्यात आला. अंगणवाडी सेविकांना पगारासाठी आंदोलन कराव लागत परंतु अद्यापही त्यांना पगारवाढ मिळाली नाही. सरकारने दरवर्षी २ करोड रोजगार देण्याची घोषणा चार वर्षापूर्वी केली होती परंतु रोजगार मिळाला नाही. शेतमालाला भाव नाही. महागाईने उच्चांक गाठला. हाताला काम नाही. अशा सर्व गर्तेत आज जनता अडकली आहे. सरकार हिटलरप्रमाणे सत्तेचा गैरवापर करत आहेत. सरकारच्या विरोधात कुणी आवाज काढण्याचा प्रयत्न केला तर सत्तेच्या बळावर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची अवस्था बकाल झाली आहे. पंतप्रधान धनदांडग्यांना आणि पक्षातील लोकांच्या तिजोऱ्या भरण्यात व्यस्त आहेत. विदेशातून कोणताही उद्योग आला नाही. गुंतवणूक नाही. जे उद्योगधंदे होते त्यांची वाट लागली. ज्या जनतेने डोक्यावर घेतले तीच जनता देशात हिटलरशाहीचा अस्त करेल. अन्यथा देश पूर्णपणे बरबाद होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. हे सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments