Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकास्टींग काऊचचा तमाशा!

कास्टींग काऊचचा तमाशा!

कास्टींग काऊच वरुन चर्चेला पुन्हा उधाण आले. कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टींग काऊच बाबत बोलताना म्हटले होते की, कास्टींग काऊच असले तरी येथे मुलींना रोजी रोटी मिळते. बलात्कार करून सोडून दिले जात नाही. तर रेणुका चौधरींनी याविषयी बोलताना म्हटले होते की, प्रत्येक क्षेत्रात कास्टींग काऊच आहे अगदी संसदही त्यापासून सुटू शकलेली नाही. परंतु प्रत्येक क्षेत्रात हे चालत असेल तर ते संतापजनक आणि चीड निर्माण करणारा प्रकार आहे. परंतु सर्वच क्षेत्रात असले घाणेरडे प्रकार होत नाही. आणि सगळेच धुतलेल्या तांदळासारखे आहेत असं पाठराखण करणेही चुकीचेच आहे. मात्र काही तथाकथीत भाष्यकारांनी सरोज खानवर व कास्टींग काऊचवर योग्य मत मांडल्यावर नको ते तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. यामध्ये काही माध्यमांचाही समावेश आहे. चंदेरी दुनियेत तर भाग्य आजमावण्यासाठी कुणी स्वत:हून तयार होत असेल तर कास्टींग काऊचवर चर्चा होणारच. कास्टींग काऊचचे आरोप कुणी इंडस्ट्री बाहेरचे लोक करतात असाही प्रकार नाही. टॉलिवूडमधील अभिनेत्री श्री रेड्डीने हैदराबादमध्ये फिल्म चेंबरच्या बाहेर आंदोलन सुरु केले. यातील धक्कादायक बाब म्हणजे श्री रेड्डी चक्क टॉप लेस आंदोलनाला बसली होती. तेलगु चित्रपटांमधील कास्टिंग काऊचच्या विरोधात आंदोलन केल्याचा दावा तिने केला होता. चित्रपटात काम मिळण्यासाठी श्री रेड्डीला अयोग्य पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगण्यात आले होते. या विरोधात तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. खरतर एक दोन नव्हे तर इंडस्ट्रीमधले शेकडो कलाकारांनी कास्टींग काऊच बाबत होकारच दिला आहे. अभिनेत्री राधीका आपटे, वर्षा उसगावकर, उषा जाधव, यांच्यासह अभिनेत्यांचाही समावेश आहे. स्थानिक लोकांना संधी मिळत नसल्याचे श्री रेड्डीचा आरोप होता. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजने तिच्याशी झालेल्या सेक्शुअल हरासमेंटबद्दल धक्कादायक खुलासा केला. जेनिफरच्या या खुलाशानंतर पुन्हा एकदा हॉलिवूड निर्माता हार्वे विइंस्टीन वादाला हवा मिळाली. अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेजने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय वाईट अनुभवांचा सामना करावा लागला होता. कोरियोग्राफर सरोज खान आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनीही लैंगिक अत्याचाराबाबत वक्तव्य केले. शत्रुघ्न म्हणाले की, बॉलीवूड आणि राजकारण दोन्ही क्षेत्रात हे सुरुच असते. सरोज खान आणि रेणुका चौधरी दोघींचेही म्हणणे चुकीचे नाही. सिन्हा म्हणाले की, तुम्ही मला खूश करा मी तुम्हाला खूश करतो हा दोन्ही क्षेत्रात पुढे जाण्याचा हा एक मार्ग आहे आणि तो अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. जर इंडस्ट्रीचे बडे कलाकार बोलत असतील तर त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यामुळे छातीठोकपणे आरोप होत आहेत. यावरुन राजकारण करुन महिलांची बदनामी होत आहे असा आरोप करणे चुकीचेच आहे. एवढे मात्र निश्चित सर्वच क्षेत्रात्र कास्टींग काऊचच्या नामाने तमाशा सुरु आहे एवढे मात्र निश्चित.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments