Friday, May 10, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसरकार विरोधात एकवटले!

सरकार विरोधात एकवटले!

भाजपा सरकार कोणालाही विश्वासात न घेता जनविरोधी निर्णय घेत आहेत. माध्यमे, न्यायपालिका आणि महत्त्वाच्या संस्थावर केंद्र सरकारने ताबा घेतला. भाजपामध्येच सरकारच्या धोरणाला अंतर्गत कडाडून विरोध होत आहे. काही नेते उघडपणे बोलत आहेत तर काहींची मुक नाराजी आहे. देशातील वातावरण सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात जात आहेत. यामुळेच नाराज भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी अ-राजकीय मंचाची सहा सदस्यीय सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या समन्वयकपदी सुधींद्र कुलकर्णी व अ‍ॅड. आभा सिंह यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड, झिनत शौकत अली, सुचेता दलाल हेसुद्धा समितीत असणार आहेत. भाजपातील नाराज नेते खा. शत्रुघ्न सिन्हा, भाजपा आ.आशिष देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे खा. कुमार केतकर, राष्ट्रवादीचे खा.माजिद मेनन, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, आपच्या नेत्या प्रीती मेनन यांच्यासह प्रीतीश नंदी, तुषार गांधी हे सुध्दा यामध्ये शामील आहेत. माध्यमे, न्यायपालिका आणि महत्त्वाच्या संस्था केंद्र सरकारने ताबा घेतला.संस्थांची स्वायत्तता जपण्यासाठी राष्ट्रीय मंचातर्फे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. मंचातर्फे मोर्चे काढण्यात येणार आहे. सरकार हिटलर सारखे वागत आहेत. देशात जातीयव्देश वाढला आहे. सरकारमधील मंत्री, तसेच इतर राज्यांमधील मंत्री हे जातीयव्देश पसरविण्या पलीकडे कोणतेही काम त्यांच्याकडून होतांना दिसत नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अत्याचार, दंगलीच्या घटनांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली नोकरशाहीचा मस्तवालपणा वाढला. भाजपाशासीत तसेच भाजपाच्या पाठिंब्यावरील राज्य बकाल झाले आहेत. सरकारच्या धोरणामुळे सर्वच जातीधर्माचे, पंथाचे लोक नाराज आहेत. भाजपाने नेमलेले पगारी हस्तक (ट्रोल) यांच्याकडून धार्मिकव्देष पसरविणारे पोस्ट सर्वत्र पसरविले जात आहेत. या पोस्टमुळे समाजा-समाजामध्ये तेढ पसरविण्याचे काम केले जात आहेत. भाजपाच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील मातब्बर नेते मंत्री पदावर काम केलेले अनुभवी नेते पक्षाच्या सरकार विरोधात बंड पुकारत आहेत. भाजपासाठी ही चिंतेची आणि धोक्याची घंटा आहे. सरकार विरोधात देशभरात सर्व विरोधक एकवटत असतांना अचानक अ-राजकीय मंच स्थापन होणे हि साधी गोष्ट नाही. भाजपा सरकार अस्तित्वात आल्यापासून तसेच भाजपाशासीत राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार,गुन्हेगारी वाढली. सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सपशेल अपयशी ठरले आहेत. चार वर्ष उलटून गेले प्रचंड प्रमाणात बेकारी वाढली. महागाई दोनशे टक्यांनी वाढली. अशा सर्व स्थितीत एक रोष सरकारच्या विरोधात आहे. त्याला आता अ राजकीय मंचने पुढाकार घेतल्यामुळे सरकारला जनताच हद्दपार करेल अशी चिन्हे उमटू लागली आहेत.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments