Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमोदींची फिरकी!

मोदींची फिरकी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात इतिहासाचे दाखले देतात त्यावेळी ते कसे चुकतात अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मोदी भाषणाच्य ओघात चुकीची आकडेवारी,माहिती देऊन निघून जातात परंतु त्यांच्या चुकीच्या विधानांचा समचार घेतला जातो. मात्र आज जे काही घडले त्याने मोदींची युझर्सने जास्त फिरकी घेतली. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) करण्यात आलेल्या एका ट्विटचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला. पीएमओने हे ट्विट करताना एक चूक केली आणि अर्थाचा घोर अनर्थ झाला. या ट्विटमध्ये एक स्वल्पविराम (कॉमा) देण्यास पीएमओ कार्यालय विसरलं आणि मोदी सरकारवर टीका करण्याची संधी शोधणा-यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. अनेकांनी पंतप्रधान मोदींना या ट्विटमुळे धारेवर धरलं तर मोदींचे समर्थकही त्यांची बाजू मांडण्यासाठी सरसावले, पण टीका करणा-यांची संख्या जास्त होती. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींद्वारे राज्यसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला होता. चला आपण सर्व एकत्र मिळून गरीबांना चांगली गुणवत्ता असलेली आणि स्वस्त आरोग्यसेवा मिळेल यासाठी काम करू असं मोदी राज्यसभेत म्हणाले होते. पण ट्विट करताना गरीब आणि चांगली यामध्ये स्वल्पविराम देण्यास पीएमओ कार्यालय विसरलं. आपण सर्वांनी एकत्र मिळून खराब गुणवत्ता असलेली स्वस्त आरोग्यसेवा मिळेल यासाठी काम करू असा त्याचा अर्थ झाला. पंतप्रधान कार्यालयाकडून हे ट्विट येताच त्यावर टीका होण्यास सुरूवात झाली. या ट्विटला रिप्लाय देताना एका तरूणीने ट्विट केलं…”खराब आणि स्वस्त आरोग्यसेवा…मला आश्चर्य वाटलं नाही…यापेक्षा दुसरं काहीही होऊ शकत नाही”. ”भाजपाला शाळेत जाण्याची गरज आहे” असं ट्विट एका युझरने केलं. ”अखेर सत्य बोलण्याची तुम्ही हिंमत केलीच….हे मान्य केल्याबद्दल तुमचे आभार” असं ट्विट आणखी एका युझरने केलं. तर ”एक कॉमा चुकल्यामुळे कोमात जाण्याची वेळ आली” असं ट्विटही एकाने केलं. खरतर पंतप्रधानांच्या भाषणावर खासदार रेणूका चौधरींसह बरेच नेते सभागृहात हसल्याची घटना घडली होती. पंतप्रधान जे बोलतात त्यावर विश्वास करायचा नाही असा प्रचारही विरोधकांकडून होत आहे. तसेच धारावाहिक सुरु होण्याआधी सांगितले जाते या धारावाहिक मधील सर्व पात्र काल्पनिक आहे त्याचा पात्राशी कोणताही संबंध नाही. तशीच गोष्ट मोदी जे बोलतात त्याचा काही संबंध नाही अशी फिरकी आता घेतली जात आहेत. परंतु पीएमओ कार्यालयाकडून जी चूक झाली ती साधी चूक होती परंतु नेटकऱ्यांना आणि विरोधकांना फिरकी घेण्यासाठी आयत कोलीत मिळालं.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments