Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखआता "छत्रपतींना"तर सोडा!

आता “छत्रपतींना”तर सोडा!

ज्या छत्रपतींचा नाव घेऊन भाजपाने सत्ता हस्तग केले त्याच शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अहमदनगरच्या भाजपाच्या उपमापौराने केला. लष्कारांबद्दल अपमानजनक प्रकार ताजा असतांना आता दुसरा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असतांना अहमदनगर मध्ये भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचा व्हीडीओ महापालिकेच्या कर्मचाऱ्याने लिक केल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. परंतु प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच भाजपने सावध भूमिका घेत श्रीपाद छिंदम यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. तसेच छिंदम यांचा उपमहापौर पदाचा राजीनामाही घेतला.परंतु शिवप्रेमी जनतेने त्या उपमहापौराच्या घरावर,दुकानावर तसेच औरंगाबादेत भाजपाच्या कार्यालयावर हल्ले केले. काही बसगाड्यांची नासधुन केली. दुसरीकडे, जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यलयावर दगडफेक झाल्याची घटना घडली. श्रीपाद छिंदम हा गुंड प्रवृत्तीचा आहे. प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या छिंदम यांच्यावर विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याची धमकी देणे, असे गुन्हे दाखल आहेत. ऐन निवडणुकीत त्याच्या विरोधात तडीपारीची नोटीस निघाली होती. त्याने जो आज प्रकार केला त्यानंतर चूक लक्षात आली. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल छिंदम यांनी जनतेची हात जोडून माफी मागितली. मात्र त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शिवप्रेमी जनतेतून होत आहेत. खरतर शिव छत्रपतीचा अपमान हे कुणीही सहन करणार नाही. शेवटी तो खालच्या स्तरावरील आणि संतापजनक प्रकार छिंदमने केला. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगिराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली. छिंदम यांचे कार्यालय व घरासमोर शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने गोंधळ घातला. छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली़ गाड्या फोडल्या. परंतु त्याच्यावर सरकार गुन्हा दाखल करेल का? त्याला वाचवण्याचा प्रकार तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. छिंदम यांच्या अटकेची मागणी केली. परंतु असे प्रकार सत्ताधारी भाजपाच्या मंडळीकडून का होत आहेत. सध्या भाजपाबद्दल सोशल मीडियावर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या उपमहापौराला अटक झाली नाही तर राज्यातील परिस्थिती अजून चिघळू शकते. मात्र सत्तेची मस्ती एवढी चढली की कुणाबद्दल काही बोलायचे आपले कुणीही काहीही वाकडे करु शकत नाही असा प्रकार सध्या जोरात चालू आहे. असेच सध्याचे चित्र आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments