Thursday, April 18, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखशेतकऱ्यांच्या ‘मृत्यू’ ला जबाबादार कोण?

शेतकऱ्यांच्या ‘मृत्यू’ ला जबाबादार कोण?

शेतकऱ्यांना कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागते. असे संकट विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले. कीटकनाशकाच्या फवारणीमुळे ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
राज्यात अडीच वर्षांत १० हजारांवर शेतकऱ्यांनी नापिकी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे निराश होवून आत्महत्या केल्या. यामध्ये पुन्हा कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यूने त्यामध्ये भर पडली. सरकारने दिलेली आश्वासने ‘खोटी व फसवी’ ठरल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच विदर्भातील शेतकऱ्यांचा कीटकनाशकांच्या फवारणीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील शेतकऱ्याचा फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. कीटकनाशक फवारणीच्या बळींचा आकडा वाढत असताना सरकारने केवळ मदतीचा मुलामा जाहीर करीत मूळ प्रश्न कायम ठेवला होत यावरून संताप व्यक्त होत आहे. आधीच शेतकरी त्रस्त असतांना त्यामध्ये निष्पाप शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सरकारने नोंदणी नसलेल्या कीटकनाशक आणि खतांच्या विक्रीवर बंदी घातली परंतु ज्या निष्पाप शेतकऱ्यांचे मृत्यू झाले त्या शेतकऱ्यांचे काय? सरकारने कितीही आर्थिक मदत केली तरी ते जीव परत येणार नाही सरकारने तातडीने परवानाधारक दुकानातून खत नियंत्रण आदेश १९८५ व कीटकनाशक नियंत्रण रेमंडळाद्वा मान्यता प्राप्त कृषी निविष्ठांचीच विक्री करण्यात यावी, असे आदेश काढले. अलीकडच्या काळात कृषीक्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले. ते थेट शेतात पोहोचले, पण त्याचा वापर कसा करायचा हेच सांगणारे कुणी नसले की काय होते, हे या मृत्यूंनी दाखवून दिले आहे. कीटकनाशकाच्या फवारणीसाठी देशी पंप वापरला तर दिवसभरात दीड एकर आणि चिनी बनावटीचा पंप वापरला तर दहा एकराची फवारणी होऊ शकते, हे लक्षात आल्यावर शेतकरी या पंपाच्या मागे धावले. मात्र, असे मोठे पंप वापरताना घ्यावयाची काळजी सांगणारे त्यांना कुणी भेटले नाही. कापसाच्या बीटी बियाण्यांवर कीड पडू शकत नाही, असा दावा नेहमी केला जातो. हे तांडव घडलेल्या यवतमाळात यंदा ९९ टक्के हेच बियाणे वापरले गेले व त्यावर पडलेली कीड ३३ जणांचे बळी घेणारी ठरली. यंदा कपाशीचे झाड खूप उंच वाढले. त्यामुळे फवारणी करताना पाइप वर धरावा लागला व त्यातून विषबाधा झाली असे तकलादू स्पष्टीकरण शासकीय यंत्रणा देत आहेत. आजवर हीच कीटकनाशके प्राशन करून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची उमेद बाळगली आहे, त्यांनाही त्यामुळेच मृत्यू यावा हे अतिशय क्लेशदायक आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, म्हणून यवतमाळ दौऱ्यावर आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी औषध फवारणीचा प्रयत्न सु दैवाने सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढचा अनर्थ टळला. खोत यवतमाळला मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘जय जवान जय किसान आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर जय जवान जय किसान संघटनेने मोठे आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे यासाठी .राज्यभरातील शेतकऱ्यांचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकरी हवालदिल झाला असून कधी असमानी तर कधी सुलतानी संकटांना शेतकऱ्यांनाच त्याचा मुकाबला करावा लागत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments