केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ या मुद्द्यांवरून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शनिवारी काही ठिकाणी आंदोलन केली. सत्तेत राहून शिवसेना विरोध करत असून शिवसेनेचा ढोंग,नाटकीपणा आहे. शिवसेनेला जर खरच जनतेची काळजी असेल तर भाजपाचा पाठिंबा काढून सरकार मधून बाहेर पडावे. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढावे.
शिवसेना सत्तेत राहून सत्तेच्या ‘मलाई’ वर ताव मारत आहेत. सरकारमध्ये राहून सरकारच्या ध्येय धोरणा विरोधात बोलायचे आणि आपल्या जे हव आहे ते पदरात पाडून घ्यायचे अशी शिवसेनेची ‘ब्लॅकमेलींग’ आणि सोयीची खेळी सुरु आहे. जनतेला मुर्खात काढण्याचा हा प्रकार आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार झालेला पक्ष आहे. भाजपा शिवसेनेला किंमत देत नाही. शिवसेनेला स्वत:ची भूमिका उरली नाही. अशा सर्व परिस्थितीत शिवसेना सरकारमध्ये शामील आहे. शिवसेनेने सुरुवातीपासून सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेने आंदोलनाच्या वेळी कटआऊटमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक करण्यात आले. मोदींवर टीका करण्यात आली. मनमोहन यांची आर्थिक धोरणे योग्य असल्याचे फलकांवर लिहिण्यात आले होते. सत्तेत येण्याआधी भाजपच्या नेत्यांनी महागाईच्या विरोधात जी निदर्शने केली होती ती छायाचित्रे या कटआऊटमध्ये लावण्यात आली होती.
शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन ‘नरेंद्र मोदी सरकार हाय हाय’, ‘देवेंद्र फडणवीस सरकार हाय हाय’ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घोषणा दिल्या. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. अनिल देसाई, आ. अनिल परब, आ. नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेचे बहुतांश सर्व लोकप्रतिनिधी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. शिवसेना महागाईचे खापर भाजपावर फोडत आहे. शिवसेना सत्तेत असली तरी सत्तेची चावी ज्यांच्या हाती आहे त्यांनी ही भाववाढ केल्याने दुर्दैवाने हा मार्ग पत्कारावा लागत असल्याची भावना शिवसेचे नेते व्यक्त करत आहेत. शिवसेनेचा आरोप हा हास्यास्पद व केविलवाणा आहे. शिवसेना सरकारमध्ये शामिल आहेच ना! हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महागाईला जेवढी भाजपा जबाबदार आहे तेवढीच शिवसेनाही जबाबदार आहे. शिवसेनेला जबाबदारी झटकून चालता येणार नाही. कारण, शिवसेनेलाही मंत्री पद मिळालेले आहे. पुन्हा त्यांच्या सोईनुसार त्यांना मंलाईदार मंत्रीपद मिळाली तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. महागाई वगैरे, वगैरे सर्व विसरून जातील. शिवसेनेला खरच जनते बद्दल प्रेम असेल तर त्यांनी भाजपावर खापर फोडण्याएवजी खिशातील राजीनामे बाहेर काढून सत्तेतून बाहेर पडावे. तर‘आणि तरच शिवसेनेला पुढे ‘अच्छे’ दिन येतील अन्यथा येत्या निवडणूकीत पराभवाला यांनाही सामोरे जाण्यास मतदार भाग पाडतील.