Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशकेंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो तरुण देशोधडीला : प्रियांका गांधी

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो तरुण देशोधडीला : प्रियांका गांधी

Priyanka Gandhi,Priyanka, Gandhi,Priyanka Gandhi Vadra,Vadraनवी दिल्ली : केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे आज देशातील तरुण देशोधडीला लागला आहे. देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारीवर काहीच बोलत नाही. सरकार केवळ मोठ-मोठी नावे आणि जाहिराती देत आहेत, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात ३ कोटी ६४ लाख तरूण बेरोजगार आहेत, अशी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर शरसंधान साधले आहे. नोकऱ्या देण्याच्या आश्वासनांचा मोदी सरकारला विसर पडला आहे. देशातील सात मोठ्या क्षेत्रात जवळपास साडे तीन कोटी लोक बेरोजगार आहेत. मोठ-मोठी नावे आणि जाहिराती दिल्याचा हा परिणाम आहे. देशात सध्या ३ कोटी ६४ लाख बेरोजगार लोक आहेत. त्यामुळेच सरकार नोकऱ्यांवर चर्चा करीत नाही, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही केंद्र सरकारवर हल्ला चढवला. देशात बेरोजगारी वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारने एनआरसी ऐवजी बेरोजगारीची संख्या मोजायला हवी, असा सल्ला दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

एनआरसी म्हणजे फाळणी करण्याचे साधन

सुशिक्षित बेरोजगारांची भारतीयांना राष्ट्रीय नोंदणी अंतर्गत नोंद व्हायला हवी. एनआरसी म्हणजे फाळणी करण्याचे साधन आहे. त्यामुळे माझ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक खास सल्ला आहे. मोदी यांनी एनआरसी ऐवजी संपूर्ण देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची राष्ट्रीय नोंदणी तयार करायला हवी. परंतु, मोदी असे करणार नाहीत. कारण त्यांना विनाशकारी अजेंडा राबवायचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. काँग्रेस लागोपाठ केंद्र सरकारवर बेरोजगारी, आर्थिक संकट, नागरिकत्व संशोधन कायदा, एनआरसीवरून केंद्र सरकारला लक्ष्य करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments