Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेश'WHO' ने दिले कारोना वायरसला ‘हे’ नाव

‘WHO’ ने दिले कारोना वायरसला ‘हे’ नाव

World Health Organization has announced that COVID-19 will-now-be-the-official-name-of-the-Coronavirusजिनिव्हा : जगभरात काही दिवसापासून भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. कारण चीनमध्ये कारोना वायरसने धुडघूस घातला आहे. कारोना वायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत 1,367 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59,805 लोकांना या वायरसची लागण झाली आहे. जगभरात या वायरसवर संशोधन सुरु असून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना वायरसच्या संसर्गाला ‘कोविड-19’ असे नाव दिले आहे.

कारोना वायरसचा संसर्ग पहिल्यांदा 31डिसेंबर 2019 रोजी चीनमध्ये आढळून आला. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुस यांनी जिनिव्हा येथे बोलताना कोरोना विषाणूला कोविड-19 असे अधिकृत नाव दिल्याचे सांगितले. को म्हणजे कोरोना, व्ही म्हणजे वायरस (विषाणू) आणि डी म्हणजे डिसीज (आजार) असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणू हा जगासाठी मोठा धोका

कोरोना विषाणू हा जगासाठी मोठा धोका असल्याचे (WHO)डब्ल्यूएचओने म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग २५ देशांमध्ये पसरला आहे. हा विषाणू नेमका कसा निर्माण झाला याचा जगभरातील शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेसह अनेक देश कोरोना वायरसवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही.

कारोना वायरस कसा पसरतो?

हा संसर्गजन्य आजार आहे. हे विषाणू एकाकडून दुसर्‍याकडे संक्रमित होऊनच आपले अस्तित्व टिकवतात. प्राण्याकडून मनुष्याकडे संक्रमित होणे हाही एक अस्तित्व टिकवण्याचा प्रकार आहे. प्रथम हा विषाणू भक्ष्याची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी करतो आणि आपली संरचना बदलतो. याप्रकारे हा आजार वेगाने प्रसारित होतो.

कारोना वायरसची लक्षणे कोणती
सर्वसामान्य लक्षणे ही ताप, सर्दी खोकला, श्‍वसनाला त्रास होणे व न्यूमोनिया ही असतात. काही रुग्णांमध्ये श्‍वसनाच्या त्रासाव्यतिरिक्‍त उलटी, मळमळ व डायरिया ही लक्षणे असू शकतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments