Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeकोंकणठाणेमहिलेची दोन मुलांसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या!

महिलेची दोन मुलांसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या!

Pregnant Woman Pushed From Running Mumbai Local Train by Her Husbandपालघर : पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळील खैराफाटक पुलाजवळ महिलेनं दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये ८ महिन्यांचे बाळ व ४ वर्षांच्या मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. गुजरातहुन-मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीखाली महिलेनं उडी मारली आहे. बोईसर खैरा फाटक पुलाजवळ अपघात घडण्याची ही वर्षातील सहावी घटना आहे.

महिलेच्या आत्महत्येमुळे परिसरात एकचं गोंधळ उडाला. रविवार (१९ जानेवारी) सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी ही घटना घडली. महिलेनं आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तसंच, रेल्वे अधिकारी महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments