Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईट्रंम्प यांचा तीनतास दौरा, नट्टापट्यावर १०० कोटीची उधळपट्टी कशासाठी?

ट्रंम्प यांचा तीनतास दौरा, नट्टापट्यावर १०० कोटीची उधळपट्टी कशासाठी?

Narendra Modi Donald Trump,Narendra Modi, Donald Trump,Narendra, Modi, Donald, Trump,Gujarat,Gujrat

मुंबई :  भाजपने गुजरात मॉडलच्या नावावर निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. परंतु गुजरात मॉडलचा खरा चेहार वारंवार समोर आला आहे. अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप अहमदाबादमध्ये २४ फेब्रवारीला येत आहेत. त्यासाठी रस्त्यांची कामे आणि सौंदर्यीकरणावर गुजरात सरकार १०० कोटीपेक्षा जास्त पैशांची उधळपट्टी करत आहेत.

नरेंद्र मोदी देश विदेशात दौरा करतात परंतु कोणतीही गुंतवणूक भारतात होत नाही. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप गुजरात दौ-यावर येणार आहेत. अहमदाबादमध्ये ट्रंप तीन तास थांबणार आहेत. ट्रंप यांना अहमदाबाद चकाचक दाखवण्यासाठी गुजरात सरकार जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करत आहेत. त्यामध्ये १७ रस्त्यांची डागडुजी करणार आहे. मोटेरा स्टेडियम ते एअरपोर्ट रस्त्यासाठी एकुण १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. इतर जेवणाचा, सुरेक्षेच्या खर्चाचा त्यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे एक मिनिटासाठी ५५ लाख रुपये एवढा खर्च होणार आहे. त्यामुळे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची उधळपट्टी होणार आहे.

कशावर किती खर्च होणार…

ट्रंप यांचा ताफा ज्या रस्त्यांवरून जाणार त्यासाठी ८० कोटी खर्च

१२ ते १५ कोटी ट्रंम यांच्या सुरक्षेवर

७ ते १० कोटी मोटेरा स्टेडियममध्ये पाहुण्यांच्या जेवणावर खर्च होणार

६ कोटी झाडांवर खर्च

४ कोटी रुपये सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments