Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवारांवर आरोप करणारे हे वारकरी परिषदवाले कोण?,आव्हाडांचा सवाल

शरद पवारांवर आरोप करणारे हे वारकरी परिषदवाले कोण?,आव्हाडांचा सवाल

Jitendra Awhad Tweets,Jitendra Awhad, Tweets,Jitendra, Awhadमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये, असा आरोप राष्ट्रीय वारकरी परिषदेने केला. याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी हे पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला आहे. ‘पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये,’ अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं आहे.

Jitendra Awhad,Jitendra, Awhad

याला उत्तर देतांना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, “वारकरी प्रथा परंपरा सुरु झाली ती इथल्या कर्मकांडाविरुद्ध पांडुरंग भक्तीमध्ये तल्लीन झालेले संत यांचेच प्रभोधन करत होते आणि कट्टर मनुवादी त्याला विरोध (करतात.) हे वारकरी परिषदवाले कोण आहेत याची ओळख द्यायला नको,” असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

काय आहे वारकरी परिषदेचं आरोप…

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी हे पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला आहे. ‘पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये,’ अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं आहे.

वक्ते महाराज यांचा परिचय…

वक्ते महाराजांना २०१८ सालचा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा ‘ग्यानबा तुकाराम पुरस्कार’ मिळालेला आहे. त्यांची हिंदुत्वावादी संघटनांशी जवळीक असल्याची चर्चा नेहमीच होत असते. हिंदुत्ववाद्यांबरोबर काम करणारे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात असणाऱ्या वारकऱ्यांवर वारकरी परिषदेचा प्रभाव आहे. खास करुन मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भामध्ये वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच वक्ते महाराजांनी जारी केलेल्या या पत्रकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments