Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशराज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला मतदान!

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला मतदान!

'This' party unites against the Citizenship Amendment Bill in rajya sabha

नवी दिल्ली : १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या सर्व जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे.

मतदानासाठी आयोगाने २६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. ६ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मार्च असेल. १६ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून १८ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख असेल.

महाराष्ट्रात ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यामुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक त्रासदायक ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments