Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये ‘या’ विषयावर चर्चा होणार!

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये ‘या’ विषयावर चर्चा होणार!

Sonia Gandhi Uddhav Thackeray,Sonia Gandhi, Uddhav Thackeray,Sonia, Gandhi, Uddhav, Thackeray

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज दिली दौ-यावर आहेत. आज शुक्रवार (२१ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा ( CAA ) विरोधात चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सीएए हा कायद्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याला विरोध केला आहे. पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, पंजाब या राज्यांमध्ये सीएए ला विरोध करण्यात आला. महाराष्ट्रातही सीएए विरोधात विधेयक पारित करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, इतर सामाजिक संघटनांनी केली आहे. त्यामुळे याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

देशभरात सीएए विरोधात निदर्शने सुरु आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए कायदा मागे घेणार नाही. सरकार एक इंचही मागे हटणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनकर्तेही आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाही. युपीएने संसदेमध्ये सीएए ला विरोध दर्शविला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments