Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रवाशाचा CAA- NRC ला विरोध, मुजोर टॅक्सीचालकाची पोलीसांकडे धाव!

प्रवाशाचा CAA- NRC ला विरोध, मुजोर टॅक्सीचालकाची पोलीसांकडे धाव!

CAA NRC Uber driver,CAA, NRC, Uber driver,CAA NRC Uber, driver,Uber, driverमुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) ला देशभरात समर्थन आणि विरोध सुरु आहे. काही ठिकाणी समर्थनही सुरु झालं. जयपूरमधील कवी बप्पादित्य सरकार याला मुंबईत याचा भलताच अनुभव आला. CAA-NRC बाबत विरोधात वक्तव्य केल्यामुळे उबर चालकाने थेट सांताक्रूझ पोलीस स्टेशन गाठलं आणि कवी बप्पादित्य सरकारच्या अटकेची मागणी केली.

दरम्यान, पोलिसांनी चौकशी करुन कवी बप्पादित्य सरकारची सुटका केली. परंतु उबर चालकाच्या या मुजोरीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. या बाबत सर्व माहिती ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी ट्विटर पोस्ट करत सगळा घटनाक्रम सांगितला आहे. रोहित सिंह असं या चालकाचं नाव असून तो भोपाळचा रहिवासी आहे. एटीएममधून पैसे काढायचे असल्याचं खोटं सांगत त्याने बप्पादित्य सरकार याला पोलीस ठाण्यात नेलं. तुम्ही लोक आमचा देश नष्ट करायला निघाले असताना आम्ही फक्त पाहत बसायचं का असं ओरडत तो पोलिसांकडे अटकेची मागणी करु लागला.

२३ वर्षीय बप्पादित्य सरकार जुहू येथून आपल्या मित्राच्या घरी कुर्ला येथे चालला होता. यावेळी चालक रोहित सिंह याने आपल्याला एटीएममधून पैसे काढायचे असल्याने थोडा वेळ एका जागी थांबलो तर चालेल का अशी विनंती केली. बप्पादित्य सरकार याने होकार दिला. पण जेव्हा कॅब सांताक्रूझ पोलीस ठाण्याबाहेर थांबली. बप्पादित्य सरकारला हा प्रकार संशयास्पद वाटला.

रोहित सिंह पोलिसांना घेऊन आला “तुम्ही याला अटक करा. हा देश जाळण्याबद्दल बोलत होता. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे”. पोलिसांनी यानंतर जवळपास दोन तास बप्पादित्य सरकारची चौकशी केली. वकिलाने मध्यस्थी केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

गळ्यात लाल स्कार्फ घालू नको 

पोलिसांनी बप्पादित्य सरकारला गळ्यात लाल स्कार्फ घालू नको, तसंच नेहमी हातात डफली घेऊन फिरु नको. सध्या नाजूक वेळ आहे असा सल्ला दिला. पोलिसांनी बप्पादित्य सरकारकडे त्याचं कुटुंब, नोकरी, मित्र आणि विचारसरणी या सगळ्याबद्दल चौकशी केली. पोलिसांनी त्याचे व्हॉट्सअॅप चॅट तसंत फोन रेकॉर्डही तपासले. पोलिसांनी यावेळी त्याच्याकडे सीएए विरोधातील आंदोलनात सहभागी का होतोस असंही विचारलं. यावर बप्पादित्य सरकारने आपला देश वाचवण्यासाठी विरोध केला पाहिजे असं सांगितलं.

बप्पादित्य सरकारने घर सोडलं…

बप्पादित्य सरकार आपल्या मित्रासोबत कुर्ला येथे राहत होता. पण चालकाकडे आपला पत्ता आहे या भीतीने रात्रीच त्याने घऱ सोडलं आणि राहण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेला. “टॅक्सी चालकाचं एक वाक्य सतत माझ्या डोक्यात फिरत आहे. मी तुला कुठेही घेऊन गेलो असतो पण आभार मान पोलीस ठाण्यात घेऊन आलो,” असं बप्पादित्य सरकार सांगतो. पोलिसांनी चालक रोहित सिंहविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. कोणीही तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. माझा लढा कोणा एका व्यक्तीविरोधात नसल्याचं सांगत बप्पादित्य सरकारने तक्रार देण्यास नकार दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments