Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रहा देश कुणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांनी भाजपला डिवचले

हा देश कुणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांनी भाजपला डिवचले

sanjay raut mp shivsena

मुंबई : देशभरात सध्या नागरिकत्व संशोधन विधेयकावरून (CAA ) गोंधळ सुरु आहे. ठिकठिकाणी मोर्चे,जाळपोळ सुरु आहे. आतापर्यंत देशभरात २१ आंदोलकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. भाजपचे कार्यकर्ते कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट करुन भाजपला इशारा दिला आहे.

राऊत ट्विटमध्ये म्हणाले…

सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में

किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है

असं ट्विट करुन राऊतांनी एकाप्रकारे भाजपला डिवचले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे विधेयक मंजुर झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले होते. हा कायदा संविधानात बसतो का? हे हि तपासावे लागेल असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे असे सांगितले होते. तसेच दोन दिवसांपूर्वीच उध्दव ठाकरे म्हणाले होते, विधेयकाविरोधात मोर्चे काढायचे जरुर काढा. लोकशाहीमध्ये सर्वांना मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. परंतु शांततेत मोर्चे काढा असे सांगितले होते. महाराष्ट्रातून कुणालाही बाहेर काढले जाणार नाही, कुणीही काळजी करण्याची गरज नाही असंही सांगितलं. होतं.

संजय राऊत विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून पत्रकार परिषदा, तसेच ट्विट करुन भाजपला डिवचण्याचे काम करत आहेत. राऊत भाजवर प्रहार करण्याची एकही संधी सोडत नाही. शेरोशायरीच्या माध्यमातून भाजपवर घणाघाती टीका करण्याचे काम सध्या सुरु आहे. यामुळे भाजप याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments