Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमुख्य बातम्याहे विधेयक अल्पसंख्याकांविरोधात नाही : अमित शाह

हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधात नाही : अमित शाह

NRC will be implement across the country Amit Shahनवी मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

या विधेयकावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला प्रचंड विरोध दर्शविला आहे. मात्र, हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधात नाही, असं दावा शाह यांनी सभागृहात केला.

सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकावर आक्षेप घेत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली. चौधरी म्हणाले, हे विधेयक म्हणजे दुसरे काहीही नसून देशातीलच अल्पसंख्याक लोकांना लक्ष्य केलं जात आहे.” यावर उत्तर देताना गृहमंत्री शाह म्हणाले. हे विधेयक शून्य टक्केही देशातील अल्पसंख्याकांविरोधात नाही. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल. त्यावेळी सभागृहाचा त्याग करू नका, असेही शाह म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments