Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेचे दोन झेंडे, निवडणुकीत वेगळा झेंडा राहील : राज ठाकरे

मनसेचे दोन झेंडे, निवडणुकीत वेगळा झेंडा राहील : राज ठाकरे

Raj Thackeray MNS Flag,Raj Thackeray, MNS Flag,Raj, Thackeray, MNS, Flag, MNS Flag Update,MNS Flag change,Maharashtra Navnirman Senaमुंबई : महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचा आज (गुरुवार २२ जानेवारी) नवा झेंडा लाँच करण्यात आला. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला. दुसरा झेंड्यावर पक्षाची निशाणी आहे. तो झेंडा निवडणुकीच्या काळात वापरायचा आहे. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज एकदिवसीय महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नवा झेंडा लाँच करण्यात आला आहे. मनसेला अपयश आल्यामुळे मनसे आपल्या भूमिकेत बदल करणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे १४ वर्षानंतर मनसे पक्षाचा झेंडा बदलला आहे. पक्षाचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अपमान होता कामा नये असंही राज ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला झेंडा असून त्याचा अपमान होता कामा नये असंही राज ठाकरे म्हणाले.

ट्विटर हँडलवरुन हटवला होता झेंडा

मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसत आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मनसेच्या झेंड्याकडे लागले आहे.

मराठी मुद्यानंतर अपयश आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांकडे वाटचाल

मनसेची १४ वर्षापूर्वी स्थापना झाल्यानंतर परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली होती. मराठी मुद्दा आणि मराठी पाट्यांवरून राजकारण केले. त्यानंतरही अपयश आले. २००९ चा अपवाद सोडता मनसेला अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments