Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकर्जत येथे भरदिवसा चोरीचे प्रकरण वाढले, फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला; चोरट्यांना कुणाचा ...

कर्जत येथे भरदिवसा चोरीचे प्रकरण वाढले, फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला; चोरट्यांना कुणाचा आर्शीवाद?

कर्जत :  कर्जतच्या लाखरन व्हिलेजमध्ये स्टार इंडिया प्रोजेक्ट मधील एका फ्लॅटचे कळीकोंडे तोडून चोरटयांनी डल्ला मारला. घरातील वस्तू, देवींच्या मूर्तीसह दीड दोन लाखांचा सामान घेऊन  पोबारा केला. घराची नासधूण केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्जत येथे भरदिवसा चोरीचे प्रकरण वाढले असून चोरट्यांना कुणाचा आर्शीवाद आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, NBC ग्रुपच्या डायरेक्टर, दैनिक ऑफ्टरनून व्हॉईसच्या मुख्य संपादीका डॉ. वैदेही तामण यांच्या मालकीचा कर्जत लाखरन व्हिलेज येथील स्टार इंडिया येथे वन बीएचके फ्लॅट आहे. सध्या तो फ्लॅट बंद होता. तामण कुटुंबिय यांचे तेथे येणे जाणे कमी प्रमाणात होते. चोरट्यांनी हीच संधी साधून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

उत्तम ठाकूर कॉन्ट्रॅक्टर यांनी 26 नोव्हेंबररोजी वैदेही तामण यांना फ्लॅटच्या गेटचे फोटो पाठवले. माहिती दिली की, तुमच्या गेटचे कुणी कुलूप तोडले. त्यानंतर ताबडतोब वैदेही तामण यांनी एका ओळखीच्या व्यक्तीला फ्लॅटवर  पाठवले असता गेट आणि खिडक्यांवर जाळी लावलेली होती. त्यामुळे त्या व्यक्तिच्या हे लक्षात आलं नाही. त्या व्यक्तिकडून सर्व व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली.

परंतु आठ दिवसानंतर वैदेही तामण फ्लॅटवर पोहचल्यानतंर प्रत्यक्ष चित्र वेगळे होते. सगळी जाळी तुटलेली होती. उत्तम ठाकूर यांनी पाठवलेले फोटो पाठवले होते त्यापेक्षा चित्र वेगळेचे होते. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर डॉ.वैदेही तामण यांनी भीती व्यक्ती केली.  पुढे जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार काेण?असा सवाही उपस्थित केला आहे.

कदाचीत हत्या झाली असती?

उत्तम ठाकूर यांना मी घराच्या सुरक्षेसाठी पैसे देत होते. काही दिवसांपूर्वी मी पैसे देणे बंद केले आहे. आज माझ्या घरात चोरी झाली. जर मी घरात असते तर माझी कदाचीत हत्या झाली असती? अशी भीती डॉ. वैदेही तामण यांनी व्यक्त केली आहे.

चोरट्यांनी डल्ला मारून परिसरात दारू पार्टी रंगवली

चोरट्यांनी घरातील सगळ्या वस्तू चोरून नेल्या. सगळे सामान अस्तव्यस्त करुन ठेवलेले होते. चोरी केल्यानंतर आनदोत्सव साजरा म्हणून परिसरात दारु पार्टी केली. त्यामुळे परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच आणि खाली ग्लास आढळून आले आहेत.

विशेष म्हणजे उत्तम ठाकूर यांचे बरेच कामे परिसरात सुरु आहेत. भरदिवसा चोरट्यांनी फ्लॅटवर डल्ला मारला. त्या परिरात यापूर्वीही चो-या झाल्या आहेत अशीही माहिती समोर येत आहे. परंतु ते चोरटे कोण? हा प्रश्न उपस्थित होतं आहे. चोरीच्या घटना वारंवार का घडत आहेत. चोरटे पोलिसांना का सापडत नाही अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

हे सर्व भरदिवसा कुणाच्या आर्शीवादाने घडले?

कर्जत परिसरात भरदिवसा चोरटे घराचे ग्रील कटरने कापून घरात प्रवेश करतात. परीसरात दारु पार्टी करतात. सामान घेऊन जातात. हे कुणाच्या लक्षात का आले नाही. चोरट्यांना कुणाचा आर्शीवाद आहे?, चोरट्यांना या भागातली सर्व माहिती होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरमध्ये वाद

कॉन्ट्रॅक्टर उत्तम ठाकूर यांनी दोन वर्षापूर्वी प्लॅटचे काम केले. बिल्डर आणि गावक-यांचा वाद होता. बिल्डरचे भाऊ प्रदीप सज्जन, संदीप सज्जन हे भाऊ आहेत. प्रदीप सज्जन यांनी इमारतीचे काम केले होते. परंतु तेथील पाणी व इतर सुविधांमुळे तेथील रहिवांशाचा वाद झाला होता. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे.

डॉ. वैदेही तामण ह्या पत्रकार असल्यामुळे एका डॉक्यूमेंटरीवर काम करत होत्या त्यामुळे त्यांनी तेथे घराचे काम करुन घेतले होते. घराचे काम उत्तम ठाकूर यांच्या टीमने केले होते. गणेश भिसे, अंकूश ठाकरे, रुपेश ठाकरे, मनोहर भिसे यांनी हे काम केले होते. त्यामुळे या सगळ्यांना फ्लॅटची सर्व माहिती होती.

बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांमध्ये पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद सुरु होता अशीही माहिती समोर आली आहे. बिल्डर यांनीही चो-या झाल्या असा आरोप केला असून येथील टाईल्स उत्तम ठाकूरच्या घरात लावल्या असा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या सर्व प्रकरणात सखोल चौकशी केली तर सर्व गुन्हे उघडकीस येतील. याबाबत तिळ मात्र शंका नाही.

विशेष म्हणजे परिसरात कामे सुरु असल्यामुळे कुणी संशय घेतला नसेल. चोरटे भरदिवसा घरफोडी करतात त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनात भीतीची  निर्माण झाली आहे. या चोरी प्रकरणी कर्जत पोलीसांना घटनेच्या ठिकाणी पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी एपीआय भोर करत आहेत.

राष्ट्रवादीच्या एका माजी आमदाराने पोलिसांना फोन करुन सर्व  प्रकरणात नरमाईची भूमिका घ्या म्हणून दबावतंत्राचा वापर केला. अशीही चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या माणसांचे राजकिय लागेबांधे असल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments