Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या साथ, समय आणि समर्पण; पोस्टमुळे तर्कवितर्क

संजय राऊतांच्या साथ, समय आणि समर्पण; पोस्टमुळे तर्कवितर्क

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा हा सामना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलाच रंगला होता. मात्र, सत्तास्थापनेनंतर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राऊत आणि शिवसेना असा सामना राऊतांच्या नाराजीतून दिसून येत आहे. त्याबाबत जोरदार चर्चा सुरु असतांना राऊतांच्या फेसबुक पोस्टमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

खासदार संजय राऊत यांनी त्यांचे बंधू सुनिल राऊत यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे नाराज नाही. आम्ही पक्षाला कधीही काही मागितले नाही. आम्ही पक्षाला देणारे आहोत. असं स्पष्ट केलं तरी सुध्दा त्यांच्या आजच्या फेसबुक पोस्टमुळे ते नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.


काय आहे फेसबुक पोस्टमुळे….

खासदार संजय राऊत यांच्या फेसबुक पोस्टमुळे नव्या चर्चेला ऊत आला आहे. ‘हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपके ये तीन भेट दी हो, साथ, समय और समर्पण…’ अशी संजय राऊत यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आणखी दुरावा वाढला आहे का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी ‘ट्विटर’वर आपल्या हटके अंदाजात नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments