Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवार पोलिसांच्या मदतीसाठी धावले, गृहमंत्र्यांना पत्र!

शरद पवार पोलिसांच्या मदतीसाठी धावले, गृहमंत्र्यांना पत्र!

sharad pawarमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आता पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिसांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे. तसं पत्रही त्यांनी गृहमंत्र्यांना लिहिलं आहे.

स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त मिरजमधील आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्यांप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे पवारांनी यावेळी लक्ष वेधले.

पवार म्हणाले की, ”जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात.”

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही

”सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही,” असं मत पवार यांनी पत्रात मांडलं.

त्यामुळे सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाव्यात. पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, अशी विनंती करणारे पत्र मी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवले आहे. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे, असंही पवार यांना म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments