Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेच्या झेंड्याविरोधात संभाजी बिग्रेडची पोलिसांकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा!

मनसेच्या झेंड्याविरोधात संभाजी बिग्रेडची पोलिसांकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा!

MNS New Flagमुंबई : महाराष्ट्र नवर्निमाण सेना (मनसे) चा नवा झेंडा लाँच करण्यात आला. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला. त्यामुळे मराठा संघटना, संभाजी ब्रिगेड या संघटना संतप्त झाल्या आहेत. संभाजी बिग्रेडने मनसे विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात पुणे येथे तक्रार दाखल केली आहे. मनसे विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मराठा सेवा संघटनेते नेते व आर. आर. पाटील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे महाराष्ट्र नवर्निमाण सेना (मनसे) वादात अडकली आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (गुरुवार २२ जानेवारी)  मनसेच्या एकदिवसीय महाअधिवेशनाला सुरुवात  झाली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नवा झेंडा लाँच करण्यात आला आहे. मनसेला अपयश आल्यामुळे मनसे आपल्या भूमिकेत बदल करणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे १४ वर्षानंतर मनसे पक्षाचा झेंडा बदलला आहे. पक्षाचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मात्र यावरून वाद उफाळला आहे.

Sambhaji Brigade MNS,Sambhaji Brigade, MNS,Sambhaji, Brigade

मनसेच्या नवीन झेंड्यावरून का झाला वाद

मनसेच्या नवीन झेंड्यांमध्ये शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला. राजमुद्रा एक वैशिष्ट आहे. राज्याची अधिकृततची झालर असते. राजमुद्रेचा वापर करणे गैरकृत्य आहे.

तामिळनाडू सरकारने १८ नोव्हेंबर १९५७ रोजी कायदा केला. तशाप्रकारे राजमुद्रेचा समावेश The  prevention  of  insult to National Honor १९७१ यामध्ये करावा व केंद्राला शिफारस करावी अशी मागणी आर. आर.पाटील फाऊंडेशनतर्फे विनोद पाटील यांनी तक्रार केली आहे.

संभाजी ब्रिगेडचा काय आहे आक्षेप…

मनसेने भगव्या रंगाचा झेंडा आणला त्याचा स्वागत आहे. परंतु त्याच्यावर राजमुद्रेला आमचा आक्षेप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारासाठी राज्यमुद्रेचा वापर केला. मनसे राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. मनसेनं तो झेंड्यावरील राजमुद्रा काढून घ्यावी. अन्यथा आम्ही मनसेच्या कार्यालयासमोर आणि संपूर्ण राज्यात आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments