मुंबई: निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो एस्कॉर्ट करण्यासाठी आपलीच सरकारी इनोव्हा गाडीचा वापर केला होता आणि स्वतः 25 फेब्रुवारीला ‘क्राइम सीन’पर्यंत गेले होते. या गोष्टीचा खुलासा ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA केला आहे. अशीही माहिती समोर येत आहे.
NIA च्या चौकशीदरम्यान CCTV फुटेजमध्ये PPE किट परिधान केलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला वाझे यांनी PPE किट नष्ट केल्याचे पुरावे सापडले आहेत. सचिन वाझे यांनी किटच्या आतून जे कपडे घातलेले होते ते मर्सिडीज कारमधून जप्त केले आहेत.
वाझे यांचा निकटवर्तीय चालवत होता इनोव्हा कार
NIA च्या सूत्रांनी सांगितले की, सचिन वाझे हेच इनोव्हा कार चालवत स्कॉर्पिओच्या मागे-मागे उद्योजक मुकेश अंबानींचे घर अँटिलिया जवळ घेऊन आले होते. इनोव्हाच्या सरकारी ड्रायव्हरने NIA सांगितले की, 24 फेब्रुवारीला त्याची ड्यूटी संपल्यानंतर त्याने इनोव्हार पोलिस हेडऑफिसच्या आत उभी केली आणि तो घरी निघून गेला. ती कार कोण चालवत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रजिस्टरवर वाहनांच्या हालचालीची कोणतीही नोंद केली गेली नव्हती. अधिकृत नियमांनुसार, शासकीय वाहनाचे आगमन आणि प्रस्थान रजिस्टरमध्ये लॉग इन करावे लागते. NIA ला संशय आहे की, स्कॉर्पिओ वाझेंचे एक जवळचे कॉन्स्टेबलच चालवत होते.
PPE किटमध्ये सचिन वाझेच असल्याचा संशय
सूत्रांनुसार, NIA ला पुरावे मिळाले आहेत की, PPE किट घातलेले स्कॉर्पिओ जवळ दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच होती. CIU मध्ये काम करणाऱ्या एका सरकारी ड्रायव्हरने याची पुष्टीही केली आहे. केंद्रीय तपास एजेंसी फॉरेंसिक पोडियाट्री तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला दावा सिद्ध करत आहे. यात संशयितास ओळखण्यासाठी पायांच्या ठसा व चालण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला जातो. जर या चाचणीच्या परीक्षणावरुन वाझेंच्या उपस्थितीची पुष्टी झाली, तर हे प्रकरण उलगडण्यास मदत होईल.