Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रयेस बँकच्या कपूरांना सवाल, मोदींचा मास्टर स्ट्रोक कसा लागला?

येस बँकच्या कपूरांना सवाल, मोदींचा मास्टर स्ट्रोक कसा लागला?

Yes Bank Rana Kapoor,Yes Bank, Rana Kapoor,Yes, Bank, Rana, Kapoor

मुंबई : उद्योजक आणि व्यावसायिकांना वारेमाप कर्ज मंजुर करणाऱ्या येस बँकेच्या संकटाला बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना नेटीझन्सनी लक्ष्य केल आहे. नोटबंदीनंतर मोदी सरकारची तोंडभर स्तुती करणारे राणा कपूर सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. दरम्यान, आपण १३ महिन्यांपूर्वी बँकेतून बाहेर पडलो असून या दरम्यान काय घडले याची आपल्याला कल्पना नाही असे सांगून राणा कपूर यांनी हात झटकले आहेत.

सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, आरबीआयच्या कारवाईमुळे कपूर यांना गेल्या वर्षी येस बँकेतून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर बँकेची एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरली. कपूर यांच्या काळात अनेक कंपन्यांना असुरक्षित कर्ज देण्यात आली होती. कर्ज दिलेल्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि येस बँकेची अवस्था बिकट बनली.

निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. दरम्यान, निर्बंधांंमुळं ग्राहकांमध्ये घबराट असून, काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली. येस बँकेच्या संकटाला बँकेचे संस्ठापक राणा कपूर यांना जबाबदार धरुन नेटीझन्सनी कपूर यांना लक्ष्य केल आहे. कपूर यांनी त्यांची काॅर्पोरेट मैत्री जपली आणि मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्यानं बॅंकेची स्थिती खालावली अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये आहे. दरम्यान, आपण १३ महिन्यांपूर्वी बँकेतून बाहेर पडलो असून या दरम्यान काय घडले याची आपल्याला कल्पना नाही असे सांगून राणा कपूर यांनी हात झटकले आहेत.

पीएमसी’पाठोपाठ दुसरा धक्का…

वाणिज्यिक बँकेवर निर्बंध आल्याची ही गेल्या सहा महिन्यांतील दुसरी मोठी घटना आहे. खोटी कर्जखाती दाखवून फसवा ताळेबंद सादर करणाऱ्या पंजाब व महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासह रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले होते. त्यापाठोपाठ येस बॅंकेच्या खातेदारांना धक्का बसला आहे.

अवघ्या एका मिनिटात ४ लाख कोटींचा चुराडा…

‘बँकेच्या व्यवस्थापनाशी आरबीआयने सतत चर्चा करून बँकेचा ताळेबंद सक्षम कसा करता येईल तसे तरलता कशी ठेवता येईल, याबाबत सर्व शक्यता आजमावल्या. आपण विविध गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याचे व त्यात त्यांना यश येणार असल्याचे बँकेने आरबीआयला सांगितले होते.

खातेधारकाचे पैसे सुरक्षित – निर्मला सीतारामन

“सरकार आरबीआयच्या संपर्कात असून, प्रत्येक खातेधारकाचे पैसे सुरक्षित आहेत” असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. “आरबीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments