Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशनोटबंदीच्या क्रूर हल्ल्यातील लोकांना कठोर शिक्षा द्या : राहुल गांधी

नोटबंदीच्या क्रूर हल्ल्यातील लोकांना कठोर शिक्षा द्या : राहुल गांधी

दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या होत्या. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सरकारला ट्विटरवरून टोला लगावला. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असा हल्लाबोल गांधी यांनी ट्विटरव्दारे केली.

राहुल गांधी यांनी नोटबंदीला तीन वर्ष पूर्ण झाले. यावरून काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटबंदी नंतर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असेही गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या क्रूर हल्ल्यामागे जे काही व्यक्ती असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी गांधी यांनी ट्विटमध्ये केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments