Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी

शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी

Priyanka Chaturvedi,Priyanka, Chaturvediमुंबई : शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदींना जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या नावांची चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वीच चतुर्वेदींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे जुन्या नेत्यांना धक्का बसला आहे.

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी मिळाली आहे. खासदार अमर साबळे आणि अपक्ष भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा होती मात्र त्यांचा पत्ता कट झाला आहे.

उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले, डॉ.भागवत कराड यांनी गुरुवारी (१२ मार्च) राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

अशी असते ही निवडणूक…

विधानसभेतील २८८ सदस्यांचा विचार करता कोणत्याही पक्षाला आपला एक उमेदवार राज्यसभेत पाठवायचा असेल तर त्यासाठी ३७ आमदरांची गरज आहे. भाजपकडे १०५  आमदार असून नऊ अपक्ष आमदरांचा त्यांना पाठिंबा आहे.

विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारावर राज्यसभेत उमेदवार पाठवले. जातात. विधासभेतील आमदार आपल्या पहिल्या पसंतीची मते उमेवारांना देतात. त्या आधारावर जर निर्णय होऊ शकला नाही. तर उमदेवारांना देण्यात आलेली दुस-या पसंतीची मते विचारात घेतली जातात.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments