Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यानागरिकत्व दुरूस्ती विधेयकामध्ये राजकीय षडयंत्र; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकामध्ये राजकीय षडयंत्र; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप

Increase in security of Sanjay Raut, Y level of securityमुंबई: नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरुन सर्वत्र लोण पसरले आहे. राजधानी दिल्लीस ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलन तीव्र होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, गृहमंत्री अमित शाह हे या विधेयकात पुन्हा एकदा बदल करण्यास तयार झाले आहेत. हे आम्ही अगोदरच सांगत होतो, परंतु देश पेटल्यावर देशाची राजधानी पेटल्यावर मोठ्या राज्यांमध्ये हिंसा आणि उद्रेक झाल्यावर, नुकसान झाल्यावर, या देशामध्ये धार्मिक आणि जातीय असं विभाजन झाल्यावर आपण निर्णय घेतला जात आहे. या मागे मला काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतं असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, विद्यार्थी महाराष्ट्रात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची अंमलबजावणी इतक्या तातडीने होईल, असं मला वाटत नाही,असं राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात नागरिकत्व दुरूस्ती विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतील असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यावर, मला याबाबत माहिती नाही, शिवसेना या शिष्टमंडळाचा भाग नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments