Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमुख्य बातम्यापेट्रोल-डिझेलचा भडका ; पेट्रोल 80 रुपयांच्या पार

पेट्रोल-डिझेलचा भडका ; पेट्रोल 80 रुपयांच्या पार

मुंबई : गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत चालली आहे. देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 80 रुपयेतर डिझेलची किंमत प्रति लीटर 70 रुपये झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 27 पैशांनी वाढ झाली असून सध्या पेट्रोलचा दर 79.29 रुपये आहे. तर डिझेलचे 22 पैशांनी वाढल्या असून डिझेलची किंमत प्रति लीटर 70.01 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम सध्या पेट्रोल डिझेलवर झाल्याचा पाहायला मिळत आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसारदिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 73.91 रुपयेकोलकाता मध्ये प्रति लीटर 76.60 रुपयेमुंबईत 79.29 रुपये आणि चेन्नईत 76.83 रुपये झाली आहे. तसेच डिझेलच्या किंमतीही वाढल्या असून दिल्लीत डिझेल प्रति लीटर 66.93 रुपयेकोलकाता 69.35 रुपयेमुंबईत 70.01 रुपये आणि चेन्नईत 70.76 रुपये प्रति लीटरने डिझेलचीच विक्री होत आहे.

देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत पाहायला मिळत आहे. परभरणीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 81.51 रुपये आहे. तर डिझेलचा दर 81.40 रुपये आहे. त्याशिवाय नागपूरमध्ये रविवारी पेट्रोलचे दर 79.79 रुपये होता. तर आज नागपुरात पेट्रोलची किंमत 80.08 रुपये झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments