Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन पुन्हा मनसेत!

पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन पुन्हा मनसेत!

Pankaja Munde Prakash Mahajan,Pankaja Munde, Prakash Mahajan,Pankaja, Munde, Prakash, Mahajan

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश केला आहे. प्रकाश महाजन हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत. महाजन हे पूर्वीही मनसेत होते. त्यानंतर मनसेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती. मनसे आक्रमक होत असतांना त्यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती पकडला.

मनसेचा आज पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुध्द मोर्चा आहे. यासाठी राज्यातून मनसे सैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ जानेवारीच्या महाअधिवेशनातचं महामोर्चाची घोषणा केली होती. त्या घोषणेला प्रतिसाद देता मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

मनसेने झेंडा बदलल्यानंतर पक्षामध्ये नवचैतन्य आले आहे. मनसे आणि भाजप युती होणार आहेत अशीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला सोडचिठ्ठी देऊन बाहेर गेलेले पदाधिकारी कार्यकर्ते मनसेत दाखल झाले आहेत. प्रकाश महाजन हे पूर्वी मनसेमध्ये होते. मात्र, मध्यंतरी त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. शनिवारी त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेमध्ये प्रवेश केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments