Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशदिल्ली दंगल : विरोधकांचे आंदोलन, शाहांच्या राजीनाम्याची मागणी!

दिल्ली दंगल : विरोधकांचे आंदोलन, शाहांच्या राजीनाम्याची मागणी!

Congress Protests,Congress, Protests,Delhi Violence,Delhi Riots,Amit Shah Resign,Amit Shah,GO Back Amit Shah,Amit Shah Resignation,Amit Shah Istifa doनवी दिल्ली : आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यसभेत गुलाम नबी आझाद, संजय सिंह यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्ली दंगलीवर चर्चेची मागणी केली. त्यानंतर गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

केंद्र सरकारला दिल्ली दंगलीची स्थिती सामान्य करायची असती तर सरकारला तीन दिवस तीन रात्री झोप लागली नसती अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी डोळ्यांवर काळी पट्टी आणि तोंडावर बोट ठेवून निषेध केला. आम आदमी पार्टीच्या खासदारांनीही महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर धरणे दिले. दंगेखोरांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात, हिंसा समर्थक भाजप मुर्दाबादचे फलक झळकवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments