Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशशर्जील म्हणाला, माझ्या व्हिडिओचा काही भागच व्हायरल!

शर्जील म्हणाला, माझ्या व्हिडिओचा काही भागच व्हायरल!

Sharjeel Imam,Sharjeel, Imamनवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) विद्यार्थी शर्जील इमामने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत. माझ्या व्हिडिओचा काही भागच व्हायरल झाला आहे, एक तासाचं भाषण केलं होतं, तो पूर्ण व्हिडिओ नाही,” असं शर्जीलचं म्हणणं आहे.

अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये दिलेल्या प्रक्षोभक भाषणाच्या व्हिडीओसोबत छेडछाड झाली नसून तो व्हिडीओ स्वतःचाच असल्याचंही शर्जीलने स्वीकारलंय.

”मात्र, व्हिडिओचा काही भागच व्हायरल झाला आहे, एक तासाचं भाषण केलं होतं, तो पूर्ण व्हिडिओ नाही,” असं शर्जीलचं म्हणणं आहे. भाषणावेळी उत्साहाच्या भरात सिलीगुडी कॉरिडॉरचा संपर्क तोडण्याचं विधान केलं, असंही त्याने म्हटलंय. पण, शर्जीलनं विचारपूर्वक आणि रणनितीअंतर्गत भाषण दिलं होतं, असं शर्जील ची चौकशी करणाऱ्या क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २५ जानेवारी रोजी बिहारच्या फुलवारी शरीफ येथे शाहीनबागप्रमाणे सीएए-एनआरसीच्या विरोधात विरोध प्रदर्शन सुरू होते. तिथे भाषण देण्यासाठी शर्जील गेला असताना आपल्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचं त्याला समजलं. त्यानंतर तो अंडरग्राउंड झाला, अशी माहिती शरजीलने पोलिसांच्या चौकशीत दिली. क्राइम ब्रँचच्या सुत्रांनुसार, शर्जीलने फुलवारी शरीफमध्ये आपला मोबाइल बंद केला आणि थेट काको या आपल्या गावी पोहोचला.

वजन असल्याने त्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध होत होती.

त्याआधी शर्जीलचा भाऊ मुझम्मिल याला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुझम्मिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शर्जीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, शर्जील स्वत: दिल्ली पोलिसांपुढे शरण आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, शर्जीलला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments