Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशपश्चिम बंगालमध्ये NRC च्या भीतीने ३१ जणांचा मृत्यू : ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये NRC च्या भीतीने ३१ जणांचा मृत्यू : ममता बॅनर्जी

West Bengal Chief Minister Mamata Banerjee, center, leads a protest against a new citizenship law in Kolkata India, Monday, Dec.16, 2019. The new law gives citizenship to non-Muslims who entered India illegally to flee religious persecution in several neighboring countries. (AP Photo)

नदिया (प. बंगाल): देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. आसाममध्ये एनआरसीमुळे आतापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे तर पश्चिम बंगालमध्ये एनआरसीच्या भीतीने ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, असा धक्कादायक दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

नदिया जिल्ह्यात आयोजित एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपशी असहमत असलेल्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपकडून सध्या राबवला जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. देशात आधीच सीएए आणि एनआरसीवरून आंदोलनांचा वणवा भडकलेला असतानाच ममता यांनी गंभीर आरोप केल्याने या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments