Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeदेशनिर्भयाच्या खून्यांची फाशीची तारीख आठवडाभरानंतर!

निर्भयाच्या खून्यांची फाशीची तारीख आठवडाभरानंतर!

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार व खून प्रकरणातील चारही खून्यांना फाशी कधी होणार, हे आजही निश्चित होऊ शकले नाही. फाशीची नवी तारीख निश्चित करण्यास दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने आज नकार दिला. दोषींना कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दोषींना कायदेशीर मार्ग अवलंबण्यासाठी परवानगी मिळालेली असताना त्यांना फासावर चढवणे हे पाप ठरेल, असे कोर्टाने नमूद केले. दोषींना कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून ती बाबही कोर्टाने अधोरेखित केली. तिहार कारागृह प्रशासनाने निर्भया प्रकरणातील दोषींविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ काढला जावा, अशी विनंती करणारी याचिका पतियाळा हाऊस कोर्टात केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता कोर्टाने उपरोक्त टिपण्णी करत कारागृह प्रशासनाची विनंती फेटाळली.

ती मुदत अद्याप संपलेली नाही...

तिहार कारागृह प्रशासनाच्या वतीने अॅड. इरफान अहमद यांनी म्हणणे मांडले. राष्ट्रपतींनी या प्रकरणातील तीन दोषींच्या दया याचिका फेटाळल्या आहेत. याक्षणी चार दोषींपैकी एकाचाही अर्ज, आव्हान वा अन्य याचिका कोणत्याही कोर्टात प्रलंबित नाही. त्यामुळे या चारही जणांच्या फाशीची तारीख निश्चित करून तातडीने ‘डेथ वॉरंट’ काढण्यात यावा, असे अहमद यांनी नमूद केले. मात्र कोर्टाने हे म्हणणे मान्य केले नाही. हायकोर्टाच्या आदेशाचा यावेळी कोर्टाने उल्लेख केला. हायकोर्टाने ५ फेब्रुवारीच्या सुनावणीत चारही दोषींना एका आठवड्याच्या आत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याची परवानगी दिली आहे. ती मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळेच दोषींना कायदेशीर मार्ग अवलंबण्यासाठी परवानगी मिळालेली असताना त्यांना फासावर चढवणे हे पाप ठरेल, असे कोर्टाने नमूद केले.

चारही दोषी सध्या तिहार कारागृहात

कनिष्ठ न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार या चारही जणांच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. हे चारही दोषी सध्या तिहार कारागृहात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments