Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशनिर्भया प्रकरण : ‘त्या’ नियम आणि कायद्याला आग लावा - आशा देवी

निर्भया प्रकरण : ‘त्या’ नियम आणि कायद्याला आग लावा – आशा देवी

Nirbhaya Mother and Accused,Nirbhaya Case,Nirbhaya
Image: DNA

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपींची पुन्हा एकदा फाशी टळल्याने निर्भयाची आई आशा देवींनी संताप व्यक्त केला. ७ वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. सरकार वारंवार मला त्या आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. मात्र जे काही सध्या सुरू आहे,  त्यामुळे आरोपींना बळ मिळत आहे. जर असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना, असा आक्रोश निर्भयाच्या आईने व्यक्त केला.

दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने निर्भयाच्या दोषींच्या ‘डेथ वॉरंट’वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे उद्या १ जानेवारी रोजी होणारी दोषींची फाशी दुसऱ्यांदा लांबणीवर गेली आहे. त्यामुळे निर्भयाची आई आशा देवी या प्रचंड संतापल्या आहेत. कोर्टाबाहेर मीडियाशी संवाद साधताना धायमोकलून रडतच त्यांनी आक्रोश केला. दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबणीवर पडेल, असं दोषींच्या वकिलांनी मला आधीच सांगितलं होतं, असं निर्भयाच्या आईने सांगितलं. दोषींचे वकील ए. पी. सिंहने मला हे आव्हान दिलं होतं. दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबणीवर टाकून दाखवतो, असं ते म्हणाले होते. सात वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. आता सरकार मला आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझी लढाई मी सुरूच ठेवीन, असं त्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments