Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याएनबीसीकडून कोरोनाच्या साथीमध्ये गरजूंना मदतीचा हात

एनबीसीकडून कोरोनाच्या साथीमध्ये गरजूंना मदतीचा हात

NBC, Newsmakers, CSR, Donation, Help, Coronavirus, Covid19, Mumbai, Vaidehi Tamanमुंबई: कोरोनाच्या प्रकोपाने सर्वत्र धूमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्यूनिकेशन लिमिटेड (एनबीसी), वैदेही एस्थेटीक आणि आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला. डॉक्टरांना मास्क,एप्रॉनचे मोफत वाटप करण्यात आले. जो पर्यंत कोरोनाचा कहर संपत नाही तो पर्यंत एनबीसी गरजूंच्या मदतीसाठी प्रयत्नशील असणार आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक गरज भागवण्यासाठी शेकडो कुटुंबियांना किराणा व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनामुळे दैनिकांची छपाई बंद असल्यामुळे छोट्या वेंडरांच्या उदरर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनाही किराणा व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले आहेत. श्रमजीवी तसेच फ्रीलांन्सर पत्रकारांनाही मदतीचा हात दिला आहे.

रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून जे डॉक्टर, इतर नर्स,सिस्टर,ब्रदर आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. अशा 300 पेक्षाजास्त डॉक्टर आणि कर्मचा-यांना मोफत मास्क आणि एप्रॉनचे वाटप करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या काळजीसाठी एनबीसीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही थोड्या प्रमाणात का होईना बळ मिळाले आहेत.

एनबीसीच्या आधार चॅरीटेबल ट्रस्टतर्फे नेहमीच गरजूवंतांना मदतीचा हात दिला जातो. आतापर्यंत हजारो लोकांना मदतीचा हात दिला गेला आहे. त्यामध्ये कुटीर उद्योग करणा-या महिला, तसेच अनाथ, तसेच छोटे व्यवसाय करणा-या गरजूवंतांना उदरर्निवाहासाठी मदत करण्यात आली आहे. सर्व गरजूवंतांना एनबीसीच्या हितचिंतकांनीही मदतीमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे यामध्ये जे आतापर्यंत गेस्ट एडिटर म्हणून आले होते त्यांचाही सहभाग लाभला आहे.  
जो पर्यंत हा कोरोनाचा भूत नष्ट होत नाही तो पर्यंत एनबीसी समूहाच्या तसेच वैदेही एस्थेटीक आणि आधार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरुच राहिल अशी माहिती एनबीसीच्या सर्व्हेसर्वा ग्रृप एडिटर डॉ. वैदेही तामण यांनी ही माहिती दिली आहे.

डॉ. तामण ह्या मुंबई विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर रामलिंग शेरे हे ग्रामिण विभागाची जबाबदारी तर एनबीसीचे कर्मचारी इतर जबाबदा-या सांभाळत आहेत.

*माणुसकी म्हणून मदतीचा वसा हाती घेतला…*

एनबीसीच्या संपादीका डॉ. वैदेही तामण म्हणाल्या की, आज पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बिकट आहेत. जे छोटे- छोटे पत्रकार आहेत.प्रुफ रिडींग,ट्रान्सनलेशन, करतात. एक एक बातमीवर त्यांचा उदरर्निवाह चालतो. आज त्यांचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोक पत्रकारांना गरजू समजत नाही. त्या लोकांकडे कुणीही लक्ष देत नाही.

तशीच परिस्थिती वेंडर,पेपर टाकणा-या लोकांचीही झाली आहे. वेंडर आणि पेपर टाकणा-या मंडळींचीही महत्वाची भूमिका माध्यमांध्ये असते. परंतु ह्यांकडे कुणी लक्ष देत नाही. मोठ्या दैनिकांच्या, मीडिया हाऊसच्या मालकांनीही लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु ती मदत त्यांच्याकडून होतांना दिसत नाही. त्यामुळे या सर्वांवर संकट कोसळलं आहे. परंतु माणुसकी म्हणून मी हे छोटे कार्य करत असून मदतीचा हात म्हणून पुढाकार घेतला असल्याची माहिती डॉ.वैदेही तामण यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments