Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रनमस्ते ट्रम्प : ट्रम्प मोदींच्या कामांची पाहणी कधी करणार? - शिवसेना

नमस्ते ट्रम्प : ट्रम्प मोदींच्या कामांची पाहणी कधी करणार? – शिवसेना

Thackeray Modi Trump,Uddhav Thackeray Modi Trump,Narendra Modi Trump,Modi Trump, Modi Donald Trumpमुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारतात दाखल झाले आहेत. ट्रम्प सहकुटुंब ताजमहाल, साबरमती आश्रमाची पाहणी करणार आहे. इतर कार्यक्रमास भेट देणार आहेत. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करणार आहेत. मोदी सरकारने केलेल्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ३६ तासांचा भारत दौरा आहेत. ट्रम्प यांच्या भेटीवरून शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून भाजपला सवाल केले आहेत. ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेच्या बाबतीत देवाण कमी व घेवाण जास्त झाली तर रुपयास बळकटी येईल. कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळलेलाच आहे. देशातील बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक मंदीचा कहर सुरू आहे. ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या भारत भेटीने हे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. तरीही ट्रम्प या पाहुण्याचे स्वागत करायला हवे. पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नयेत. ट्रम्प महाराज यावे, तुमचे स्वागत आहे, असा खोचक टोलाही शिवसेनेने भाजपला हाणला आहे. त्यावरून भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments