Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशनमस्ते ट्रम्प : साबरमती आश्रमाला ट्रम्प यांची भेट, संदेश मात्र मोदींबद्दल!

नमस्ते ट्रम्प : साबरमती आश्रमाला ट्रम्प यांची भेट, संदेश मात्र मोदींबद्दल!

Narendra Modi Donald Trump,Narendra Modi, Donald Trump,Narendra, Modi, Donald, Trumpगांधीनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर  आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमला भेट दिली. या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्रमातील व्हिजीटर्स बूकमध्ये संदेश  लिहिला. परंतु आश्रमाबद्दल कोणताही संदेश त्यांनी लिहिला नाही.

टू माय ग्रेट फ्रेंड, साबरमती व्हिजीटर्स बूकमध्ये ट्रम्प यांचा संदेश

ट्रम्प यांनी To My Great Friend Prime Minister Narendra Modi Thank You For This Wonderful Visit असा संदेश लिहिला आहे. “माझ्या महान मित्रा पंतप्रधान मोदी या सुंदर भेटीसाठी आभार,” असा याचा अर्थ आहे.

Donald Trump Signs,Donald Trump, Signs,Donald, Trump, Signs

डोनाल्ड ट्रम्प हे सकाळी ११.४० ला अहमदाबादच्या सरदार वल्लभ भाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केले. त्यानंतर भव्य रोड शो नंतर १२.३१ च्या सुमारास ट्रम्प साबरमती आश्रमात पोहोचले.

आश्रमात चरखा चालवला…

या ठिकाणी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी चरखा चालवला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments